चंद्रपूर : विद्युत तारांचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : विद्युत तारांचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या वण्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने एकाचा तर विद्युत मोटार पंप सूरू करताना दुसऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काल बुधवारी एकाच दिवसी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू नागभिड शेतशिवारात घडली. गुरुदास श्रीहरी पिसे(५२) व देवनाथ रामदास बावनकर वय (४५) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्या शेतात धानाची लागवड करण्यात आली आहे. या पिकांवर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतात येवून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी झटका मशीन किंवा विद्युत करंट लावून बंदोबस्त करतात. काल बुधवारी नागभीड शेतशिवारात शेतकरी नारायण दामोधर लेणेकर ह्यांनी आपल्या शेतात पिकांचे वन्य प्राण्यांपासून बंदोबस्त करण्यासाठी बॅटरी व जिवंत विद्युत तारा प्रवाहित सोडल्या होत्या. सर्वप्रथम एका डूकराला विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

सदर शेताला लागून असलेला शेतकरी गुरुदास श्रीहरी पिसे(५२) रा.नागभीड हा शेतात गेला असता त्याला विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना समोर आली. दुसरी घटनाही नागभीड शेतशिवारातच घडली. दाचेवार यांच्या मालकीची शेती देवनाथ रामदास बावनकर शेतकरी करतो. तो काल सायंकाळी शेतातील मोटार पंप सूरू करण्यासाठी गेला होता. पंप सुरु करीत असताना त्याला जोरदार विद्युत शॉक लागला.

हेही वाचलंत का?

Back to top button