पुढारी वृत्तसेवा
आपल्या दैनंदिन जीवनातील काही सामान्य वाटणाऱ्या सवयी नकळतपणे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करतात. पचनसंस्था बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चुकांविषयी जाणून घेवूया.
जेवण खूप घाईगडबडीत केल्यास पोट फुगणे आणि अन्नातील पोषक तत्वांचे शोषण व्यवस्थित न होणे, अशा समस्या उद्भवतात. घाईगडबडीत जेवण करु नका.
आहारात फायबरचे प्रमाण कमी असल्यास पचनक्रिया मंदावते. बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. त्यामुळे आहारात फायबरचे प्रमाण वाढवा.
दीर्घकाळ राहणारा तणाव पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संतुलनावर परिणाम करतो. जाणीवपूर्वक तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा.
अवेळी जेवल्याने शरीरात ॲसिडची निर्मिती वाढते. छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते. रात्री उशिरा जेवण टाळा.
चहा किंवा कॉफीचे अतिप्रमाण पचनमार्गाला त्रासदायक ठरू शकते. यामुळे चहा-कॉफीचे सेवन मर्यादीत करा.
शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) असल्यास पचनसंस्था सुस्त होते. योग्य प्रमाणात पाणी प्या.
गरजेपेक्षा जास्त जेवल्याने जठरावर ताण येतो आणि अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया उशिरा सुरू होते.
शारीरिक हालचाल कमी असल्यास पोटविकाराचा धोका वाढतो.