

रोहे : मागील वर्षभरात मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून 164 कोटी रूपये दंड वसूल केला आहे.यामुळे फुकट्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे. 2024-25 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आलेली दंडात्मक वसूल करूनआलेले 138कोटी होती तर चालू वर्षात19टक्केने वाढ झाली आहे.
प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेतून मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर अनधिकृत व विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.तिकीट तपासणी मोहिमा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबवून, मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 202526 एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महत्त्वपूर्ण परिणाम साधले आहेत.
आर्थिक वर्ष 202526 दरम्यान, मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य, अवैध प्रवास अधिकारासह प्रवास करणाऱ्या 27.51 लाख प्रवाशांना पकडले, तर आर्थिक वर्ष 202425 मध्ये ही संख्या 25.08 लाख इतकी होती, म्हणजेच सुमारे 10% वाढ नोंदविण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 202526 मध्ये दंडाच्या स्वरूपात विक्रमी 164.91 कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर आर्थिक वर्ष 202425 मध्ये 138.44 कोटी रुपये वसूल झाले होते, म्हणजेच 19% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.नोव्हेंबर 2025 या महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य अथवा, अवैध प्रवास अधिकारासह प्रवास करणाऱ्या 3.74 लाख प्रवाशांना पकडले, तर नोव्हेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.98 लाख इतकी होती, म्हणजेच 25% पेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.नोव्हेंबर 2025 महिन्यात दंडाच्या स्वरूपात 23.63 कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर नोव्हेंबर 2024 मध्ये 14.08 कोटी रुपये वसूल झाले होते, म्हणजेच जवळपास 68% वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 साठी (एप्रिल ते नोव्हेंबर 2025) विनातिकीट / वैध तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईची विभागनिहाय माहिती व त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम पाहील्यास या मध्ये भुसावळ विभाग : 6.94 लाख प्रकरणांतून 59.25 कोटी रुपये, मुंबई विभाग : 11.34 लाख प्रकरणांतून 48.79 कोटी रुपये, पुणे विभाग : 3.05 लाख प्रकरणांतून 18.40 कोटी रुपये, नागपूर विभाग : 2.92 लाख प्रकरणांतून 18.13 कोटी रुपये,सोलापूर विभाग : 1.60 लाख प्रकरणांतून 7.50 कोटी रुपये आणि मुख्यालय : 1.66 लाख प्रकरणांतून 12.82 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
प्रवासी आपल्या मोबाईल फोनवर णढडॲप डाउनलोड करून मोबाईल ॲपद्वारेही तिकीट बुक करू शकतात.मध्य रेल्वे प्रवाशांना हेही आवाहन करते की बनावट तिकिटे तयार करण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी कोणतेही फसवे मार्ग अवलंबू नयेत आणि अशा तिकिटांवर प्रवास करू नये. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत दंड व कमाल 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे.रेल्वे विनातिकीट प्रवासाबाबत आपली शून्य सहनशीलता धोरण पुन्हा एकदा अधोरेखित करते आणि प्रवाशांना आरामदायी व सन्मानपूर्वक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करते.सुरक्षित प्रवास करा, जबाबदारीने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा. असे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेने अनधिकृत प्रवास ओळखण्यासाठी बहुसूत्री धोरण अवलंबले असून त्यामध्ये स्थानक तपासणी, अचानक तपासणी, किल्ला पद्धतीची (फोर्ट्रेस) तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश आहे. या कारवाया मेल/एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई व पुणे विभागांतील उपनगरीय गाड्यांमध्ये राबविण्यात येतात.