अंजली राऊत
साहित्य - हिरवे मूग (सोललेले) – एक कप, तांदूळ – 2 टेबलस्पून, हिरवी मिरची – 1 ते 2, आलं – अर्धा इंच, जिरे – अर्धा टीस्पून, हिंग – एक चिमूटभर, मीठ – चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, तेल – अप्पे भाजण्यासाठी
हिरवे मूग आणि तांदूळ वेगळ्या भांड्यात 6–8 तास (किंवा रात्रभर) भिजत ठेवा. त्यामुळे अप्पे हलके, मऊ आणि सहज पचन होणारे बनतात.
भिजवलेले मूग आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करा, त्यामध्येच हिरवी मिरची, आले, जिरे, मीठ, हिंग, कोथिंबीर आणि कांदा घालून थोडे दाणेदार बॅटर बनवून घ्या. त्यानंतर 10–15 मिनिटे झाकून ठेवा.
सर्वप्रथम अप्पे पॅन मध्यम आचेवर गरम करा. आता त्या पॅनमध्ये प्रत्येक साच्यात 2 थेंब तेल टाका. तयार बॅटर त्या साच्यात घालून झाकण ठेवा. 2–3 मिनिटांनी अप्पे उलटवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. झाकण ठेवल्याने अप्पे आतून चांगले शिजतात आणि मऊ राहतात.
हिरवी चटणी किंवा टोमॅटो चटणी किंवा साधं लोणी/तूपासोबत गरम गरम अप्पे आणि चहा हा परफेक्ट कॉम्बो खाताना मजा येते
बॅटर फार पातळ नको, जिरे घातल्याने पचन हलकं होते, कांदा घातला नाही तर अप्पे डब्यासाठी जास्त वेळ चांगले राहतात. अप्पे पॅन नसेल तर जाड तव्यावर छोटे डोसेसारखेही देखील बनवू शकतात.