

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात गाजलेल्या ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत अनेक बदल का करण्यात आले, यावर अखेर एकता कपूरने खुलासा केला आहे. काळानुसार प्रेक्षकांची मानसिकता बदलत गेली आणि कथानक अधिक समकालीन ठेवण्यासाठी हे बदल आवश्यक होते, असे तिने स्पष्ट केले. या मालिकेने टीव्ही विश्वाला नवी दिशा दिली, असेही तिने नमूद केले.
Ekta Kapoor reveal about leap in tv serial Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi
टीव्ही क्वीन एकता कपूरने क्युँकी सास भी कभी बहू थी मालिकेतील बदलांविषयी खुलासा केला. कथानकात आलेला लीप किती आवश्यक होता, या मोठ्या बदलामागे खास विचार होते, असे तिने म्हटले आहे. स्टार प्लसवर बहुचर्चित मालिका क्युँकी सास भी कभी बहू थीमध्ये लीप येत आहे. हा लीप केवळ नाट्यमय शेवट नव्हे तर भावनिक वास्तवतेवर आधारित आहे, असे एकता कपूरने म्हटले आहे.
एकता कपूर म्हणाली, "'टेलिव्हिजन हा सतत बदलणारा माध्यम प्रकार आहे. प्रेक्षकांची अपेक्षा, सामाजिक परिस्थिती आणि विचारसरणी काळानुसार बदलत जाते. त्यामुळे कथेतही बदल करणे अपरिहार्य असते. हा लीप आणण्यामागचा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला. प्रत्येक नातेसंबंध काळानुसार कसे बदलतात याचं प्रतिबिंब यात आहे. मालिकेत होणाऱ्या या बदलाकडे एका ओळखीच्या प्रवासाचा शेवट म्हणून न पाहता त्याकडे आयुष्यात नैसर्गिकपणे घडत जाणारा यापुढचा टप्पा म्हणून पाहिले पाहिजे. ज्यात नाती येतात ती विकसित होतात मग, अंतर वाढतं आणि भावनांना नवे अर्थ येतात."
एकता कपूर म्हणाली, 'एक कथाकथनकार म्हणून क्युँकी सास भी कभी बहू थी ही मालिका माझ्यासाठी खूपच खास आहे. नेहमीच काळानुसार वाढणारी, तुटणारी आणि बदलणारी नाती शोधण्यामागची एक गोष्ट आहे. या कथेत लीप आणताना माझा उद्देश ही मालिका बंद न करता आवश्यक ते बदल करावेत. यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांचं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करायचा.'
'आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम सुद्धा वेगवेगळ्या वळणावर आपल्याला घेऊन जात त्यावेळी होणारे गैरसमज कशा खोल जखमा देतात आणि भावनिक अंतर वाढत जातं, ही गोष्ट यातून उलगडणार आहे." रोज रात्री १०:३० वाजता स्टार प्लसवर क्युँकी सास भी कभी बहू थी पाहता येणार आहे.'