

मुरुड जंजिरा ः सुधीर नाझरे
मुरुडला आता नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत.त्यासाठी आतापासूनच हॉटेल,कॉटेजेस यांचे बुकींग हाऊसफुल्ल झालेले आहे.तसेच या वर्षीचा पर्यटन महोत्सव नेमका कोण साजरा करणार याचाफैसला रविवारी (21 डिसेंबर ) होणार आहे.यादिवशी मुरुड नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे.जो पक्ष विजयी होईल तो याबाबतचा निर्णय घेणार असल्याने शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
31 डिसेंबरला बुधवार असल्याने सुटी नसली तरी हजारो पर्यटक मुरुडला दाखल होण्याची शक्यता आहे. विविध पर्यटन स्थळामुळे मुरुड पर्यटकांच्या पसंतीला आले आहे. 27 / 28 डिसेम्बर शनिवार, रविवारची सुटी आल्याने मुरुड हाऊसफुल्ल होणार यात शंका नाही.
मुरुड समुद्रकिनारी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक सकाळ पासून हजेरी लावतात पर्यटक रात्रीचे 12 वाजेपर्यंत खान पान करतात 12 नंतर नवं वर्षाच्या शुभेच्छा देतात दर वर्षी पर्यटन महोत्सव असल्याने 12 वाजेपर्यंन्त समुद्रात स्टेजवर संगीत कार्यक्रम असतात . परंतु ह्यवर्ष संगीत कार्यक्रम नसलायने पर्यटक नाराज आहेत. परंतु निसर्ग रम्य समुद्राचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येणार हजारो वाहन मुरुड शहरात आल्यावर त्यांच्या पार्कींगचा प्रश्न मोठा जटील होणार आहे परंतु किनारा सुशोभीकरण झाल्याने 400 गाड्या पार्किंगची जागा झाल्याने पर्यटक खुश आहेत तरीही त्यासाठी पोलिसांना पूर्व नियोजन करावे लागणार आहे.
नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला असल्याने कोण विजयी होणार तो पर्यटन मोहत्सव करणार अशी हमी दोन्ही पक्षांनी दिली आहे . पर्यटक मात्र पर्यटन मोह्त्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत . पर्यटन मोहत्सवात 25 ते 1 जानेवारी विविध ओर्केस्टा ,महिलांचे कार्यक्रम खाद्य महोत्सव ,सिनेकलाकार यांची विविध कार्यक्रम असल्याने हा आनंद घेण्यासाठी पर्यटक ॲडव्हान्स बुकींग करतात .
दरवर्षी पर्यटन महोत्सव समिती वाहतुकीचे नियोजन पोलीस आणि नगरपालिका चे अधिकारी एकत्र बसून करतात .परंतु ह्यावर्षी पालिकेचा सहभाग नसल्याने पोलिसांवर ताण येणार आहे .मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची शेकडो वाहने पार्कींग होत असत परंतु ह्यावर्षी तेथे पाळणे व खेळणी बसण्यात व्यावसायिकाने भाडेतत्वार दिली जाते ,त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडणार .समुद्रालगत असणारा रास्ता हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने प्रत्यक पर्यटक वाहने त्याच रस्त्या वरून नेतो त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मुरुडला मोठ्या संख्येने येणार ,परंतु पर्यटन महोत्सवाचे आयोजन नसल्याने पर्यटक आम्हाला फोन करून विचारतात व मोहत्सव घ्या असा आग्रह करतात .मुरुडला स्वतःची वाहने घेऊन येणारे पर्यटक संख्या मोठी आहे ,किनाऱ्यावरील वाहने पार्किंगची जागा पाळणे व खेळासाठी दिल्याने पर्यटकांच्या गाड्या लावणार कुठे हा प्रश्नच आहे ,मुरुड शहराचा पार्कींगचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नियोजन करण्याची गरज आहे.
मनोहर बैले, हॉटेल वैसायिक