Crime News: १००० रूपयात १० मिनिटांचा Nude Video, ब्लॅकमेलिंग अन् जबरदस्तीचं तिसरं लग्न; कॅश अन् दागिने घेऊन नवरी गेली पळून
Crime News Andhra Pradesh Nude Video Blackmail: सायबर क्राईमचे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरूणाला न्यूड व्हिडिओच्या जाळ्यात अडवकून फक्त लाखो रूपयेच उकळण्यात आलेले नाही तर जबरदस्तीनं लग्न करून पुन्हा त्या तरूणाला गंडा घालून नवरी पळून गेल्याची घटना घडली आहे.
त्या व्हिडिओला बळी पडला अन्...
आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील २७ वर्षाच्या भरत कुमार सोबत ही घटना झाली आहे. भरत हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कमाला आहे. त्यानं सांगितलं की २०१९ मध्ये त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका युवतीचा मेसेज आला. तिनं आपल्या हतबलतेची सबब पुढे करून न्यूड व्हिडिओ दाखवण्याचा प्रस्ताव ठेवला. १ हजार रूपयात दहा मिनिटांच्या व्हिडिओ असं अमिष दाखवण्यात आले.
भरत कुमार या अमिषाला बळी पडला अन् टेलिग्रामवर फेस कव्हर्ड न्यूड व्हिडिओ पाहू लागला. याचवेळी या युवतीनं स्क्रीनशॉट घेऊन भरतला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिने हळूहळू लाखो रूपये भरत कडून उकळले.
ब्लॅकमेल करून लग्नाची घातली अट
ब्लॅकमेलिंग करता करता त्या युवतीनं लग्नाचीच अट टाकली. हतबल झालेल्या भरतने त्या मुलीची २०२१ मध्ये भेट घेतली. ही भेट लखनौ अन् गोरखपूर इथं झाली. त्यानंतर २०२३ मध्ये ही युवती हैदराबादमध्ये पोहचली आणि तिनं आत्महत्या करण्याची धमकी देत भरतला लग्न करण्यास भाग पाडलं. मार्च २०२५ मध्ये या दोघांचे लग्न मंदिरात झालं. त्यानंतर कोर्ट मॅरेज देखील झालं.
लग्नानंतरही तरूणीने भरतवर दबाव टाकणं सोडलं नाही. लग्नानंतर दोन महिन्यांनी तरूणीचा खरा चेहरा समोर आला. ती दुसऱ्या तरूणासोबत फोनवर बोलू लागली. त्याचबरोबर तिनं ४० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर देखील केले. चौकशी केली असताना तो तरूण हा त्या तरूणीचा दुसरा नवहा होता. पीडित भरत सोबत त्या तरूणीनं तिसरं लग्न केलं होतं.
लुटेरी दुल्हन, कॅश अन् दागिने घेऊन फरार
यानंतर ही तरूणी चार लाख कॅश आणि दागिने घेऊन फरार झाली. ती थेट देवरिया इथं पोहचली. पीडित भरतने न्यायासाठी पोलीसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देवरिया पोलिसांनी ही केस आंध्र प्रदेशातील असल्यानं गुन्हा तिथं दाखल करण्यास सांगितलं.
पीडित भरतचा आऱोप आहे की तरूणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे हा या तरूणाचा धंदा आहे. पीडित भरतने आपले पैसे आणि दागिने परत मिळावे आणि त्या तरूणीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

