

‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मूळ अंगुरी भाभी म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शिंदे तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या नव्या व्हिडिओमुळे ‘Bhabiji Ghar Par Hain 2.0’बाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या व्हिडिओने जुन्या आठवणी ताज्या केल्या असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Bhabiji Ghar Par Hain 2.0 actress shilpa shinde come back
अँड टीव्हीवरील हिंदी मालिका भाभीजी घर पें है इतकी लोकप्रिय झाली की आज देखील चाहत्यांना आवडते. सदाबहार कथानक असलेल्या भाभीजी घर पै हैं मालिकेबद्दल आता एक नवी अपडेट समोर आली आहे.
सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकां भाभीजी घर पर हैंने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. आजही ही मालिका तितकीच आवडीने पाहिली जाते. या मालिकेतील अंगुरी भाभी हे पात्र घराघरात पोहोचले आणि विशेषतः अगदी सुरुवातीच्या काळात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली आणि त्यानंतर ती पुन्हा या भूमिकेत दिसली नव्हती. तिच्या जागी शुभांगी अत्रे हिने अंगुरी भाभीजी ची भूमिका साकारली होती.
आता तब्बल १० वर्षांनंतर शिल्पा शिंदेचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा पूर्वीच्या अंगुरी भाभीच्या शैलीत दिसत असून तिचा अंदाज पाहून चाहते प्रचंड भावूक झाले आहेत. “सही पकड़े हैं” हा डायलॉग आठवताच अनेकांनी कॉमेंट्समध्ये जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामुळे जुनी भाभीजी पुन्हा परत येतेय, हे नक्की झाले आहे.
शिल्पा शिंदाने 'भाभीजी घर पर हैं २.०' मध्ये आपल्या कमबॅक विषयी म्हटले आहे की, ती आपल्या फॅन्ससाठी शोमध्ये वापसी करत आहे. एका कलाकारासाठी एका कलाकारासाठी १० वर्षांचा काळ खूप दीर्घ असतो. तिने कधी विचार देखील केला नव्हता की, ती पुन्हा ही भूमिका साकारेल. आता नव्या शोचे सीझन प्रीमियर डिसेंबर महिन्यात होणार आहे.
काय म्हणाली शिल्पा शिंदे?
शिल्पाने स्पष्ट केले की, "भाभी जी घर पर हैं २.०" मध्ये तिची वापसी हे कष्टाचे फळ आहे. विभूती नारायण मिश्राची भूमिका करणारा अभिनेता आसिफ शेख म्हणाला, गेल्या ११ वर्षातील हा शोचा सर्वोत्तम प्रोमो आहे. नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांना हॉरर, कॉमेडी, सस्पेन्स मिळेल.
"भाभी जी घर पर हैं २.०" मालिका २२ डिसेंबर रोजी अँड टीव्ही आणि झी५ वर पाहता येणार आहे.