Eggs and Cancer: सावधान! अंड्यांमध्ये आढळला कॅन्सरचा धोका निर्माण करणारा घटक! FSSAI कडून देशभर तपासणी सुरू

अंड्यांमध्ये नायट्रोफुरंटोइन (Nitrofurans) नावाचे प्रतिबंधित अँटीबायोटिक आढळत असल्याचा दावा केला जात आहे.
Eggs and Cancer
Eggs and Cancerfile photo
Published on
Updated on

Eggs and Cancer

नवी दिल्ली : अंड्याला सुपरफूड मानले जाते कारण त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक असतात. मात्र, सध्या अंडी खाण्यावरून एक मोठा वाद सुरू झाला आहे. अंड्यांमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण करणारे नायट्रोफुरंटोइन (Nitrofurans) नावाचे प्रतिबंधित अँटीबायोटिक आढळत असल्याचा दावा केला जात आहे.

भारतातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी सर्वोच्च संस्था 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण' (FSSAI) ने आपल्या सर्व कार्यालयांना ब्रँडेड आणि विना-ब्रँड अशा दोन्ही प्रकारच्या अंड्यांचे नमुने गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. अंड्यांमध्ये या प्रतिबंधित अँटीबायोटिकचे अवशेष आहेत का, याची तपासणी करण्यासाठी हे नमुने १० वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

Eggs and Cancer
Supreme Court: पत्नीकडे घरखर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

वादाची सुरुवात नेमकी कुठून झाली?

हा संपूर्ण वाद 'एगोज' (Eggoz) या प्रसिद्ध अंडी ब्रँडशी संबंधित आहे. भारतातील लोकप्रिय प्रीमियम अंड्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या या एगोज न्यूट्रिशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न आणि आरोग्य उत्पादनांची स्वतंत्रपणे चाचणी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'ट्रस्टिफाइड' या यूट्यूब चॅनलने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात दावा करण्यात आला आहे की, एगोज अंड्यांच्या एका बॅचच्या लॅब टेस्टिंगमध्ये 'AOZ' नावाच्या संयुगाचे प्रमाण ०.७३ पीपीबी आढळले आहे. AOZ हे नायट्रोफ्युरन्स नावाच्या प्रतिजैविकांचा अवशेष आहे. भारतात या रसायनावर बंदी आहे कारण त्याचा संबंध 'जेनोटॉक्सिसिटी'शी आहे. हे रसायन मानवी डीएनए खराब करू शकते आणि कर्करोगाचा धोका वाढवू शकते.हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. त्यानंतर सामान्य लोकांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली, ज्याची दखल नियामक संस्थांनी घेतली आहे.

नायट्रोफुरंटोइन काय आहे आणि ते आरोग्यासाठी धोकादायक आहे का?

नायट्रोफुरंटोइन हा अँटीबायोटिक्सचा एक गट आहे जो खाद्य प्राण्यांच्या उत्पादनात वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर ही औषधे कुक्कुटपालनात बेकायदेशीरपणे वापरली गेली तर त्यांचे अवशेष अंड्यांमध्ये उतरू शकतात. म्हणूनच FSSAI ने देशभरात नमुने आणि चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नायट्रोफुरंटोइनचे दुष्परिणाम काय होतात?

NHS च्या मते, नायट्रोफुरंटोइनमुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने खालील समस्यांचा समावेश आहे:

  • मळमळणे आणि उलट्या होणे

  • जुलाब

  • भूक कमी लागणे

  • डोकेदुखी आणि चक्कर येणे

  • सतत झोप आल्यासारखे वाटणे

  • काही लोकांमध्ये या औषधामुळे लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होऊ शकतो.

  • ताप, तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे.

  • खोकताना रक्त येणे

  • डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे (कावीळ सदृश लक्षणे).

Eggs and Cancer
Heart Attack: फक्त ५ मिनिटांत जीव वाचवा! घरात कोणाला हार्ट अटॅक आल्यास सर्वात आधी काय करावे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news