

वॉशिंग्टन डी सी : अनिल टाकळकर
साऱ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या एप्सटीन फाईल्समधून कोणते गौप्यस्फोट होतात याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटीज, राजकीय नेते, उद्योगपती इत्यादींची नावे त्यातून उघड होण्याची शक्यता आहे. भारतातील काही नावे त्यात असण्याच्या शक्यतेबाबतही उलटसुलट चर्चा आहे. या फाइल्समध्ये अनेक दस्तऐवज, फोटो आणि इतर पुरावे असू शकतात . त्यातून एप्सटिनच्या गुन्ह्यांबद्दल आणि त्याच्या बड्या धेंडांच्या संबंधांचा पर्दाफार्श होऊ शकतो.
काँग्रेसच्या काही डेमोक्रॅटिक नेत्यांनी याआधी एप्सटिनच्या इस्टेटमधून काढलेले शेकडो फोटो जारी केले आहेत. यात प्रसिद्ध व्यक्तींशी या गुन्हेगाराबरोबरचा च्या संपर्कांचे फोटो आहेत-परंतु त्यात गुन्हे सिद्ध झाल्याचे कोणतेही पुरावे नसले तरीही ते वादग्रस्त ठरत आहेत.
जेफरी एपस्टीन कोण?
जेफरी एप्सटिन हे एक अमेरिकन धनाढ्य प्रस्थ होते. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीचे आरोप त्याच्यावर आहेत. विविध क्षेत्रातील बडया व्यक्तीना मुली पुरवण्याचे त्याचे जाळे होते.
2019 मध्ये त्याला न्यूयॉर्क मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्या काळात तुरुंगात त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद आत्महत्येच्या रूपात झाली, परंतु त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाविषयी अनेक उलटसुलट तर्क केले जात आहेत.
एप्सटिन फाईल्स खुल्या करण्याबाबत ट्रम्प सुरुवातीपासून फारसे तयार नव्हते . डेमोक्रॅटिक पक्षाचा मला बदनाम करण्यासंबंधीचा हा कुटील डाव आहे , असे ते सांगत होते . पण त्यांच्या मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) समर्थकांनी त्या खुल्या करण्याचा आग्रह धरल्याने त्यांचा नाईलाज झाला. ट्रम्प आणि एप्सटिन यांच्या संबंधाबाबतही अनेक उलट सुलट चर्चा आहेत त्यामुळे अमेरिकेत त्याकडे अधिक लक्ष आहे.
एप्सटिन फाइल्स हा एक मोठा स्फोटक दस्तऐवज असून त्यातून अनेक गुपिते बाहेर येऊ शकतात. यात सुमारे 95 हजार छायाचित्रे आणि व्हिडीओज असल्याचे सांगण्यात येते . त्याबरोबरच असंख्य ई -मेल, प्रवास नोंदी, फोन माहिती त्यात आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये, अमेरिकेच्या काँग्रेसने एप्सटिन फाईल्स संबंधात एप्सटिन फाइल्स ट्रान्स्परन्सी ऍक्ट असा कायदा संमत केला . त्यामुळे न्याय विभागाला एप्सटिन शी संबंधित सर्व unclassified दस्तऐवज प्रकाशित करणे बंधनकारक ठरले. आहे या कायद्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.
बिल क्लिंटन, बिल गेट्स आदींची नावे
या कायद्यांतर्गत काही माहिती (उदा. पीडितांंची ओळख किंवा चालू तपासाशी संबंधित माहिती) गोपनीय ठेवली जाऊ शकते, आज न्याय विभागाकडून खूप मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि फोटोंची माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे. आधीच काँग्रेसने जारी केलेल्या फोटोंमध्ये काही प्रसिद्ध लोकांचे फोटो आहेत. बिल क्लिंटन, बिल गेट्स आदींची नावे त्यात आहेत.
काही दस्तऐवज प्रथम जाहीर होणार
डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी शुक्रवारी सकाळी सांगितले की, न्याय विभाग सरकारच्या फाइल्समधील काही दस्तऐवज सार्वजनिक करण्याची योजना आखत आहे. मात्र, ते सर्व एकाच वेळी प्रसिद्ध केले जाणार नाहीत.