मेष
महत्त्वाची कामे उत्तरार्धात करावीत, आज आपल्याला संमिश्र असा दिवस जाईल, मनासारख्या घटना घडतील.
वृषभ
आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, लाभदायक दिवस, नव्या दिशा मिळतील.
मिथुन
गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास किंवा मार्गदर्शन लाभेल, व्यावसायिकांना प्रतिष्ठा वाढविणारा दिवस.
कर्क
काहीसा काळजी वाढविणारा दिवस, नियमांचे पालन आवश्यक आहे, काही कामे मार्गी लागतील.
सिंह
साथीचे आजार बळावतील, उत्साह कमी होईल. मानसिक संतुलन आवश्यक.
कन्या
समतोल साधाल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील.
तूळ
आज सगळीकडून सहकार्य लाभेल, प्रगतीचा मार्ग दिसेल. लोकोपयोगी कार्य कराल.
वृश्चिक
आर्थिक ताणतणाव राहील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील, अपेक्षेप्रमाणे यश नाही.
धनु
ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपले अंदाज चुकतील, आत्मविश्वास महत्त्वाचा.
मकर
‘ना नफा-ना तोटा’ अशी अवस्था होईल. हाती घेतलेले काम परिश्रमाने पूर्ण होईल. कलाकारांना लाभदायक दिवस.
कुंभ
आत्मोन्नतीचे विचार येतील, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, संयम आवश्यक आहे.
मीन
आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. सेवाकार्य घडेल. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील.