Box Office Collection | Avatar Fire & Ash चं तिकिट बारीवर दमदार ओपनिंग; Dhurandhar ने पार केले ५०० कोटी, जाणून घ्या डिटेल्स

Box Office Collection | Avatar Fire and Ash चं तिकिट बारीवर दमदार ओपनिंग तर Dhurandhar ने पार केले ५०० कोटी, जाणून घ्या आतापर्यंतचे डिटेल्स
image of Avatar Fire and Ash and Dhurandhar poster
Avatar Fire and Ash- Dhurandhar Box Office Collection instagram
Published on
Updated on
Summary

बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठ्या चित्रपटांची चर्चा रंगली आहे. हॉलीवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘Avatar Fire and Ash’ने दमदार ओपनिंग घेत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे, तर दुसरीकडे ‘धुरंधर’ या चित्रपटाने ५०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. दोन्ही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Box Office Collection Avatar Fire and Ash also Dhurandhar

बॉक्स ऑफिसवर सध्या मोठ्या चित्रपटांची चुरस पाहायला मिळत आहे. एकीकडे धुरंधरला प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे तर नुकताच रिलीज झालेला हॉलीवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट Avatar Fire and Ash ने देखील दमदार ओपनिंग केलं आहे. देशांतर्गत गाजत असलेला धुरंधर आणि भारतासोबतच जगभरात रिलीज झालेला अवतार फायर अँड ॲश हे दोन्ही चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘Avatar Fire and Ash’ने प्रदर्शित होताच तिकिट बारीवर दमदार ओपनिंग घेतली आहे. मॉडर्न व्हिज्युअल्स, सुंदर कथा आणि 3D अनुभवामुळे प्रेक्षकवर्गाचे लक्ष त्याकडे वळले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ग्लोबली कोटींची कमाई केली आहे.

x account snapshot
image of Avatar Fire and Ash and Dhurandhar poster
Ekta Kapoor | 'क्युँकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील बदल का केले, एकता कपूरने केला खुलासा

जेम्स कॅमेरूनचा 'अवतार: फायर एंड एश' शुक्रवारी थिएटरमध्ये रिलीज झाला. फ्रेंचायजीच्या तिसऱ्या भागाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. इंडियन बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दुसरीकडे, ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि जबरदस्त दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीजपासून सातत्याने चांगली कमाई करत ‘धुरंधर’ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

image of Avatar Fire and Ash and Dhurandhar poster
Bhabiji Ghar Par Hain 2.0 | असली भाभीजीची तब्बल १० वर्षांनंतर वापसी, शिल्पा शिंदेचा नवा व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'ची ६०० कोटींकडे वाटचाल

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, सारा अर्जुन स्टारर धुरंधरने १५ व्या दिवशी ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी आणखी एक रेकॉर्ड बनवलं आहे. अवतार फायर अँड एश रिलीज झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी धुरंधरला पसंती दिलीय.

धुरंधरचे तिसऱ्या शुक्रवारचा गल्ला जबरदस्त असून बॉक्स ऑफिसवर अद्यापही मजबूत पकड आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरंधरने तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी २३.७० कोटींचा बिझनेस केला आहे. एकूण कलेक्शन - ५०३.२० कोटी झाले आहे.

धुरंधर: २३.७० कोटी

छावा: १३.३० कोटी

पुष्पा2 (हिंदी) : १२.५० कोटी

बाहुबली २ (हिंदी) : १०.०५ कोटी

तिसऱ्या शुक्रवारच्या कमाई नंतर आता विकेंडला शनिवार - रविवारी ही कमाई आणखी गची पकडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानात चित्रपटावर बंदी असताना देखील धुरंधरने रेकॉर्ड तोडला आङे. रिपोर्टनुसार, १.८ मिलियन पायरेसी डाऊनलोडसह हा मागील २० वर्षातील सर्वात पायरेटेड बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

धुरंधर नंतर अवतार फायर एंड एश तर कार्तिक आर्यनचा तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी आणि इक्कीस चित्रपट देखील आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवरकुणाची चलती असणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news