

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ आणि ‘अवतार’सारख्या मोठ्या सिनेमांशी थेट स्पर्धा असतानाही मराठी चित्रपट ‘उत्तर’ ने सकारात्मक धोरण, प्रेक्षकांशी थेट संवाद आणि कंटेंटवरील विश्वासाच्या जोरावर आपली जागा निर्माण केली आहे. व्हिक्टिम कार्ड न खेळता, मराठी विरुद्ध हिंदी असा वाद न उकरता, मिळालेल्या संधींचा योग्य वापर करत मराठी सिनेमा टिकून राहतोच नाही तर पुढेही सक्षमपणे लढू शकतो, असा ठाम संदेश दिग्दर्शकाने दिला आहे.
marathi bollywood hollywood movies theatre controversy
एकीकडे धुरंधरसारखे एकापेक्षा बॉलिवूडपट तर दुसरीकडे अवतार फायर अँड एशचा हॉलिवूडपट; चर्चा दोघांचीही. थिएटर्स मिळवण्यासाठीची चढाओढ... या स्पर्धेत उतरला मराठी सिनेमा 'उत्तर', ज्याची आता चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण, आहे बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपट विरुद्ध मराठी सिनेमा. मराठी चित्रपट ‘उत्तर’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. नातेसंबंध, भावना आणि आई-मुलांच्या अतूट नात्यावर भाष्य करणाऱा हा चित्रपट रिलीज झालेल्या बॉक्स ऑफिसवरील दोन मोठ्या चित्रपटांच्या फळीत सादर झाला आहे. विशेष म्हणजे क्षितीज पटवर्धन यांचा दिग्दर्शक म्हणून उत्तर हा पहिला सिनेमा आहे. आता फेसूकवर त्यांची मोठी पोस्ट व्हायरल होतेय, ज्यामध्ये त्यांनी आपले मत मांडले आहे.
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी उत्तर सिनेमा बद्दल नेमकं काय म्हटलंय?
याआधीही अनेक मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना सिनेमागृहसाठी वाट पाहावी लागली आहे. किंवा मराठी शोजसाठी थिएटर मिळत नाहीत, म्हणून सर्वांसमोर आपली व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे. पण क्षितीज पटवर्धन यांनी प्रतीक्षा करून चित्रपटाच्या शोजसाठी, थिएटर मिळवण्यासाठी काय केले, याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी यापुढे मराठी मार खाणार नाही! अशा मथळ्याखाली पोस्ट लिहिली असून त्यामद्ये काय म्हटलंय पाहुया.
चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्सटर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्या सोबत क्षितीज यांचा पहिलाच सिनेमा 'उत्तर' रिलीज झालाय. आजच्या तंत्रज्ञान युगात आई-मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. या नात्याला पुन्हा एकत्र आणणारा, पालकच नाही तर मुलांसोबत बसून पाहावा असा चित्रपट आहे. आईच्या मनातल्या भावना, तिची तगमग आणि न बोललेलं प्रेम अत्यंत संवेदनशीलपणे मांडणारा ‘उत्तर’ आहे. मग कथेचा प्लॉट वेगळा असला तरी 'धुरंधर' आणि अवतार दोन्ही चित्रपटांनी अनेक थिएटर्सचे शोज फुल्ल केले.
क्षितीज म्हणाले, रणवीरच्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. म्हणजे, धुरंधर रिलीज होताच तो इतका चर्चेत आला की, अभिनय, गाणी सर्व काही चित्रपट समीक्षक, फॅन्स यांनी तोंड भरून कौतुक केले. त्यासाठी २२ शोज ठेवण्यात आले होते. मॉर्निंग शोजपासून लेट नाईट शोजपर्यंत सर्व थिएटर्स बूक अन् हाऊसफुल्ल. मग मराठी चित्रपटाच्या शोसाठी थिएटर्स कुठून आणायचे? अशी परिस्थिती असतानाही दिग्दर्शक म्हणून क्षितीज यांनी ठरवलं की, व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी म्हणून अजिबात तक्रार करायची नाही आणि मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही.
त्यांनी थे शोज मिळतील त्याकड लक्ष केंद्रीत केलं. शोज कसे चालतील, त्यासाठी नवीन प्रयोग देखील त्यांनी केले. १२ तारखेला उत्तर रिलीज झाला, त्यावेळी उत्तम प्रतिसाद मिळाला. मग १९ ला रिलीज होतोय असं ट्रीट करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू. मुंबई, कोल्हापूर, पुणे, कॉलेजेस, शाळा, स्पर्धा, समारंभ याठिकाणी सिनेमा वेगवेगळ्या स्क्रिन्सवर सिनेमा दाखवण्यात आला. मुलेच नाही तर त्यांचे पालक, खासकरून आईंना बोलावून तो सिनेमा दाखवण्यात आला.
'उत्तर’च्या टीमने पुण्यात तब्बल पंच्याहत्तर जेन झी मुलांना मल्टिप्लेक्समधील एका स्क्रीनमध्ये आणि त्यांच्या आईला दुसऱ्या स्क्रीनमध्ये बसवून सिनेमा दाखवला. यावेळी अश्रू, शांतता, हुंदके आणि हसू साऱ्या भावना उत्तर मधून प्रतित झाल्या. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात आहे. क्षितिज पटवर्धन यांनी ‘उत्तर’ची कथा, पटकथाही लिहिली आहे. दमदार कथेचे परीक्षणे देखील सकारात्मक आणि अप्रतिम आली.
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून 'उत्तर'ची टीम विविध चित्रपटगृहांना भेट देत होती. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक कलाकारांशी संवाद साधत होते. विशेषतः अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. अनेक प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या मते, अभिनय बेर्डेच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. इतकचं नाही तर एशियन फेस्टिव्हलला निवड झाली आणि बुक माय शोवर रेटिंग देखील उत्तम मिळालं. बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांचं वादळ आलं असतानाही क्षितिज यांनी संयमाने तोंड दिलं.
क्षितिज म्हणाले की, मराठी माध्यमांनी आमचे समर्थन केलं, आमच्या कल्पनांची दखल घेतली. दुसऱया विकेंड आहे आणि दुसऱ्या आटवड्यातच ६ ठिकाणी शोज वाढले. अवतारचे संमिश्र रिव्ह्यूज आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून 'उत्तर'ला प्रतिसाद चांगला मिळताना दिसतोय! अशी वेळ पुढेही अनेक मराठी चित्रपटांवर येऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या केंटेंटवर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोहोचवावा लागणार आहे. कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!, असेही त्यांनी नमूद केलं आहे.
चित्रपटाविषयी थोडेसे...
सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना पाहता येईल असा हा उत्तर चित्रपट आहे. पडद्यावर आपल्याच घरातल्या व्यक्तिरेखा वावरताहेत, असा भास आपल्याला होतो. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी साकारलेली आई अनेकांना आपल्या स्वतःच्या आईची आठवण करून देते. अभिनय बेर्डेने साकारलेला नन्या हे पात्र अनेकांना आपल्या आजूबाजूला असल्यासारखं वाटतंय.
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे निर्मिती सावंत यांच्या भूमिका आहेत.