पिंपरी : महिलांच्या सुरक्षिततेसाठी सहाय्यता कक्ष | पुढारी

पिंपरी : महिलांच्या सुरक्षिततेसाठी सहाय्यता कक्ष

संतोष शिंदे : 

पिंपरी : देशातील महिलांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गृह मंत्रालयाकडून सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना महिला सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, पोलिस ठाणे स्तरावर महिला सहाय्यता कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

महिला अत्याचारांत वाढ
महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी- चिंचवड शहर परिसरात मागील दोन महिन्यांत 38 महिलांवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या तेराने वाढली आहे. त्यामुळे ठाणे स्तरावर महिला सहाय्यक कक्ष सुरू करण्याची गरज आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे महिला मदत कक्ष यापूर्वी सुरू करण्यात आला आहे. मात्र, पीडित महिलांना लांब पडत असल्याने स्थानिक पोलिस ठाण्यात महिला कक्ष आवश्यक आहे. ज्यामुळे पीडित महिलांची ससेहोलपट थांबेल.

एक लाखापर्यंतच्या खर्चाची तरतूद
देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे स्तरावर महिला सहाय्यता कक्ष ( थकऊ) स्थापन करण्यात येणार आहे. हा कक्ष प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी तसेच आवश्यक खर्च भागविण्यासाठी शासनाकडून एक लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महासंचालक कार्यालयाने घेतला आढावा
गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना ठाणे स्तरावर महिला सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार कार्यक्षेत्रामध्ये महिला सहाय्यता कक्ष (थेाशप कशश्रि ऊशीज्ञ) स्थापन करण्यात केले आहेत का, महिला कक्षात काय साहित्य ठेवले तसेच, आणखी काय साहित्य ठेवण्यात यावे, याबाबतचा महासंचालक कार्यालयाकडून नुकताच आढावादेखील घेण्यात आला आहे.

 

Back to top button