

Mahayuti alliance BJP Shiv Sena candidates interviews
नागपूर : आगामी मनपा निवडणुकीत स्वबळावरच लढावे, अशी भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा महायुतीच्या अडचणी वाढविण्याची चिन्हे आहेत. नागपुरातील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आता मुंबईत मोर्चा वळविला आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांना निवड मंडळाला भेटून शिंदे गट शिवसेनेने 50 जागांची मागणी केली आहे. आमदार कृपाल तुमाने, किरण पांडव, सुरज गोजे यांनी आमदार प्रवीण दटके, अनिल सोले, गिरीश व्यास यांची भेट घेत ही संभाव्य यादी दिली. दोन दिवसांत पुन्हा बसून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आल्याची माहिती आमदार तुमाने यांनी दिली.
तर दुसरीकडे सकारात्मक प्रतिसाद नसल्याने शिवसेनेने नागपूर लोकसभा प्रमुख सुरज गोजे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.२१) मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाने देखील लोकसभा संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या उपस्थितीत उद्या रविवारीच रेशीमबागेतील सेना भवनात मुलाखती ठेवल्या आहेत.
मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या. शहरातील 38 प्रभागात 151 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी मुलाखती ठेवल्या आहेत. मनसेने बैठक घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली. शिवसेना उबाठासोबत जाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.