Shashi Tharoor and PC Chacko : शशी थरुर राष्‍ट्रवादीचे वाटेवर? पीसी चाको यांनी दिले संकेत | पुढारी

Shashi Tharoor and PC Chacko : शशी थरुर राष्‍ट्रवादीचे वाटेवर? पीसी चाको यांनी दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशि थरुर हे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील, अशी चर्चा केरळमधील राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. केरळ राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष पीसी चाको यांनीही आपल्‍या विधानाने थरुर यांच्‍या प्रवेशाचे संकेत दिले आहे. ( Shashi Tharoor and PC Chacko )

…तरीही थरुरच तिरुअनंतपूरमचे खासदार राहतील : पीसी चाको

माध्‍यमांशी कन्‍नूर येथे बोलताना पीसी चाको म्‍हणाले की, “काँग्रेस खासदार शशि थरुर राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार असतील तर त्‍याचे आम्‍ही मोठ्या उत्‍साहात स्‍वागत करु. तसेच काँग्रेस पक्षाने त्‍यांना पक्षात स्‍थान दिले नाही तरी ते तिरुअनंतपूरमचे खासदार राहतील. थरुर यांना काँग्रेस पक्षात डावलेले जात आहे याची मला माहिती नव्‍हती.”

Shashi Tharoor and PC Chacko : थरुर यांच्‍याकडे पक्षानेतृत्त्‍वाचे दुर्लक्ष

शशि थरुर यांनी काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक लढवली होती. तेव्‍हापासून त्‍यांना पक्षनेतृत्त्‍वाचे त्‍यांचेकडे दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेस पक्षाध्‍यक्षपदी मल्‍लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्‍यानंतर मोठ्या निर्णयावेळी थरुर यांना लांब ठेवले जात आहे. तसेच काँग्रेसच्‍या उच्‍चस्‍तरीय समितींमध्‍येही थरुर यांना डावलले आहे. त्‍यामुळे मागील काही दिवस थरुर नाराज असल्‍याची चर्चा केरळ काँग्रेसमध्‍ये आहे. दरम्यान, राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेशबाबत माझी पीसी चाको यांच्‍याबरोबर चर्चा झालेली नाही, असे थरुर यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button