सहा फूट उंचीमुळे मॉडेलला मिळेना बॉयफ्रेंड! | पुढारी

सहा फूट उंचीमुळे मॉडेलला मिळेना बॉयफ्रेंड!

न्यूयॉर्क : अतिशय उंच व्यक्तींची प्रसिद्धी होत असते, कधी कधी गिनिज बुकमध्येही त्यांचे नाव नोंदवले जात असते; पण अशा उंचीमुळे त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंडही द्यावे लागत असते. अमेरिकेतील एक मॉडेल तब्बल 6 फूट 2 इंच उंचीची आहे. या उंचीमुळेच तिला बॉयफ्रेंड मिळत नसल्याची तिची तक्रार आहे!

मेरी तेमारा असे या तरुणीचे नाव आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी 28 वर्षीय मेरी एक मॉडेल आहे. तिच्या मते, तिला एक परफेक्ट जोडीदार हवा आहे; पण तिला तिच्या उंचीनुसार मुलगा शोधण्यात मोठी अडचण येत आहे. 6 फूट उंच असल्यामुळे तिला डेटिंगला जाणे जवळपास अशक्य झाले आहे. मेरी म्हणते, एकदा तिला डेटिंग साईटवर 6 फूट 3 इंच उंच मुलगा मिळाला होता; पण ती त्याला भेटण्यासाठी गेली तेव्हा तो केवळ 5 फूट 11 इंच उंच निघाला! त्याने साईटवर आपल्या उंचीची खोटी माहिती टाकली होती. मेरीच्या मते, उंचीमुळे तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. मला बॉयफ्रेंड केव्हाच मिळणार नाही असे लोक म्हणतात. मेरी पुढे म्हणाली की, मुलीची उंची कमी असली तरी चालेल; पण मुलाची अजिबात नको, असे लोकांना वाटते.

मुलगा उंच असावा, मेरीची ही परंपरा तोडण्याची इच्छा आहे. यामुळेच आता तिने तिच्यापेक्षा उंचीने लहान असणार्‍या तरुणांशी डेट करणे सुरू केले आहे. मेरी म्हणाली, मी कोणत्याही उंचीच्या मुलांना डेट करायला तयार आहे. मग तो लहान असो वा मोठा. मला त्याने काहीही फरक पडत नाही. मेरीने सांगितले की, तिच्या वडिलांची उंची 6 फूट 3 इंच आहे. तर आईची उंची 6 फूट 5 इंच आहे. मेरीचा एक भाऊ 6 फूट 9 इंच व दुसरा 6 फूट 10 इंच उंच आहे. मेरीच्या घरातील प्रत्येकाची उंची 6 फुटांपेक्षा जास्त आहे. एक-दोन नातेवाईक तर अगदी 7 फुटांचे आहेत. त्यांना पाहून तिच्या परिसरातील लोक आश्चर्यचकीत होतात. मेरीच्या कुटुंबाची उंची हा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?