पैठण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार एक वर्षासाठी जेरबंद | पुढारी

पैठण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार एक वर्षासाठी जेरबंद

पैठण, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने संघटित गुन्हेगारी करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी कारवाईची मोहीम हाती घेतले असून यामध्ये एम.पी.डी.ए अंतर्गत पैठण शहरातील पापानगर येथील कुख्यात गुंड अशपाक युनूस शेख (वय २४ रा.पैठण) या गुन्हेगाराला एका वर्षासाठी स्थानबद्ध करून हर्सूल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर इतर गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने पैठण पोलिसांच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारांची मुळे नष्ट करण्यासाठी अशा गुन्हेगारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे एम.पी.डी.ए कायदे अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, पैठण पोलीस निरक्षक संजय देशमुख, गुन्हा शाखेचे पोलीस निरक्षक सतिष वाघ, सपोनि सिद्धेश्वर गोरे, सफौ सुधीर ओव्हळ, पोलीस अमलदार दीपक सुरोसे, महेश माळी, नरेंद्र अंधारे, कल्याण ढाकणे, अंकुश शिंदे यांनी कारवाईची मोहीम राबवून कुख्यात पैठण शहरातील पापानगर (भोईवाडा) येथील अशपाक युनूस शेख या गुन्हेगाराला एक वर्षासाठी एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई करून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आले असून. या कारवाईमुळे इतर गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Back to top button