Raigad: कर्नाळा अभयारण्यामध्ये बस पलटी, कोणतीही जीवितहानी नाही

Raigad
Raigad

पनवेल; प्रतिनिधी: आज (दि.०७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेली बस अचानक पलटली. जे. एस. डब्ल्यू कंपनीच्या पेणकडे (बस क्रमांक एम. एस. ४६ बी यू २२३९) जाणाऱ्या बसवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे अपघात होऊन बस पलटी झाली. मात्र या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे पेणकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पनवेल पेन मार्गावर वळविण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news