जालना पोलिसांनी जप्त केला 1 कोटी 10 हजारांचा मुद्देमाल | पुढारी

जालना पोलिसांनी जप्त केला 1 कोटी 10 हजारांचा मुद्देमाल

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील देऊळगाव येथील राजा रोडवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी 58 लाख रुपयांच्या गुटख्यासह, 42 लाखाचा कंटेनर असा एकूण 1 कोटी 10 हजाराचा मुद्देमाल पकडला.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक खनाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी देऊळगाव राजा रोडवर सापळा रचून आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदारांसह गोंदेगाव रस्त्यावरील जगदंबा ढाब्यासमोर गुटख्याने भरलेला एच आर. 38 एबी.1326 कंटेनर पकडला आणि ताब्यात घेतला. महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीस बंदी असलेल्या अवैध माल जप्त केला. यावेळी कंटेनर चालक गफ्फार खान , सुलेमान खान ( रा. डुंगरपुर हरियाना) याला कंटेनरमधील असलेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो इंदौर येथुन गुटख्याने भरलेला ट्रक हुबळी कर्नाटक येथे घेऊन जात होता. या कंटेनरची पडताळणी केली असता, कंटेनर मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला 58 लाख 10 हजार 760 रुपयाचा राजनिवास पान मसाला आणि सुंगधीत जाफराणी जर्दा तसेच 42 लाखाचा कंटेनर असा 1 कोटी 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, फुलचंद हजारे, भाउराव गायके, रुस्तुम जैवाळ, सचिन राऊत, चालक धम्मपाल सुरडकर यांनी केली आहे.या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button