Delhi Crime : खंडणीसाठी दिल्लीत चिमुकलीची गळा दाबून हत्या | पुढारी

Delhi Crime : खंडणीसाठी दिल्लीत चिमुकलीची गळा दाबून हत्या

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : खंडणी उकळण्यासाठी शेजारच्या दोन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता त्याने मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि ही पिशवी त्याने दरवाजाच्या मागे असलेल्या खुंटीवर अडकवून ठेवली. नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला आहे. (Delhi Crime)

राघवेंद्र बेरोजगार झाला होता. यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्याच्या शेजारी राहणार्‍या शिवकुमारच्या खात्यात 10 ते 12 लाख रुपये असल्याची माहिती शिवकुमारची पत्नी मंजू हिच्याकडून समजली होती. त्यामुळे त्यांची मुलगी मानसी हिचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा कट आखला. त्यानुसार त्याने आधी त्याच्या कुटुंबीयांना गावी सोडले. त्यानंतर, त्याने मानसीचे 7 एप्रिलला अपहरण केले. मानसीचे अपहरण झाल्यानंतर एकच खळबळ माजली. आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू झाली. (Delhi Crime)

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाल्याने राघवेंद्र घाबरला. आपले नाव समोर येईल या भीतीने त्याने मानसीची हत्या करण्याचे ठरवले. लगेच त्याने गळा दाबून मानसीची हत्या केली.

अधिक वाचा :

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती