[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अशाच सुंदर वेब स्टोरीज् पाहण्यासाठी येथे क्लीक करा…" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा) ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बीबीसीच्या अडचणी वाढल्या आहेत. (ED Files Case Against BBC)
'बीबीसी इंडिया'विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत ईडीच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, 'बीबीसी इंडिया'वर परदेशी फंडिंगमध्ये कथित उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ED Files Case Against BBC)
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार बीबीसी इंडियाच्या काही अधिकार्यांचे दस्तऐवज आणि जबाब नोंदवण्याची मागणीही ईडीने केली आहे. कंपनीकडून थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) कथित उल्लंघनाचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर आणि चौकशीनंतर ईडीने हे पाऊल उचलले आहे.
यापूर्वीही झाली होती झाडाझडती
भारतीय तपास यंत्रणेने बीबीसीवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आयकर विभागाच्या पथकांनी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची झडती घेतली होती.
अधिक वाचा :