सांगली: एरंडोली येथे तांत्रिक बिघाडामुळे आर्मीच्या हेलिकॉप्टरचे तातडीने लँडिंग
मिरज: पुढारी वृत्तसेवा: भारतीय वायुसेनेचे एक हेलिकॉप्टर मेडिकल साहित्य घेऊन आज (दि.४) दुपारी नाशिकहून बेंगलोर कडे निघाले होते. दरम्यान, त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खंडेराजुरी येथून कमी उंचीने हेलिकॉप्टर जात होते.
एरंडोलीजवळ त्या हेलिकॉप्टरने तीन घिरट्या घातल्या. त्यानंतर ओढ्याशेजारील जान्हवी मंदिराजवळ परशु हाक्के यांच्या शेतात खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. त्यामध्ये तीन आर्मीचे जवान होते. एरंडोली, मलेवाडी परिसरातील नागरिकांनी हेलिकॉप्टर पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हवेत हेलिकॉप्टरला कंपने जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने लँडिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | An ALH Dhruv helicopter of the Indian Army had to make a precautionary landing in a field near a village in Sangli district of Maharashtra today. The chopper experienced excessive vibrations in the air. The chopper has now flown back to Nasik military station: Indian… pic.twitter.com/yQ7qwEgxtU
— ANI (@ANI) May 4, 2024
हेही वाचा