स्त्री २ टीझर प्रदर्शित: राजकुमार रावचा हॅट्रिक चित्रपट १५ ऑगस्टला येणार

फक्त एक झलक! स्त्री-२ टीझर प्रदर्शित, यादिवशी येणार चित्रपट
Stree 2 teaser out
श्रद्धा कपूर -राजकुमार रावचा स्त्री-२ चा टीझर प्रदर्शित झाला आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार राव-स्टारर स्त्री २ टीझर प्रदर्शित झाला असून श्रीकांत, मिस्टर आणि मिसेस माही नंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत. केवळ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 'स्त्री २' चा टीझर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भय, विनोदी आणि भरपूर मनोरंजनाची एक रोलरकोस्टर राईड देणारा स्त्री २ चा टीझर प्रेशकांच मनोरंजन करणार यात शंका नाही. टीझरच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना 'स्त्री' परत आल्याचे सांगण्यात आले आहे तर राजकुमार रावच्या विक्की या पात्राची पुन्हा ओळख यातून करून देण्यात आली आहे.

Summary

स्त्री चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता स्त्री २ हा चित्रपट येत आहे. १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत..

Stree 2 teaser out
अमृता खानविलकरचे साडीतील हे फोटो पाहून नजर नाही हटणार

टीझरला खूप प्रेम आणि उत्साहाने प्रतिसाद मिळत असून तो चित्रपट राजकुमार रावचा या वर्षातील सलग तिसरा हिट चित्रपट असेल असे म्हंटल जातंय. या अभिनेत्याने यापूर्वी 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही'सह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि 'स्त्री २' च्या टीझरला मिळालेला प्रतिसाद हा पुरावा आहे. 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असताना, 'स्त्री ' राजकुमार रावचे सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे.

Stree 2 teaser out
Bigg Boss OTT 3 मध्ये 'जनता की एजंट' बनलेली हॉट सना सुलतान कोण आहे?

कधी प्रदर्शित हहोणार स्त्री -२?

'स्त्री२' हा १५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राजकुमार रावचा आणखी एक चित्रपट या वर्षी रिलीज होणार असून 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Stree 2 teaser out
जॅकेट विथ साडीचा ट्रेंड; केतकी माटेगावकरने साडीवर घातले गुलाबी जॅकेट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news