फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट व्हायरल, फतेहसाठी अशी घेतली मेहनत
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वत:ला फिटनेस आयकॉन असल्याचे सिद्ध करून सोनू सूदने अनेकदा त्याच्या वर्कआउटची झलक शेअर केली आहे. आणि प्रत्येक वेळी तो बॉलीवूडमध्ये फिट राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. त्याचा वर्कआउट व्हिडिओ मधून सगळेच कायम प्रेरणा घेतात. अलीकडे अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर 'फतेह' च्या तयारीसाठी कशी तयारी केली हे दाखवलं.
‘फतेह' चित्रपटासाठी अभिनेता सोनू सूदने सर्वात कठीण वर्कआऊट केलं आहे. फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने फतेहसाठी खूप मेहनत घेतली आहे.
सोनू सूदचे २ तास फिटनेससाठी
व्हिडिओमध्ये सोनू सूद कमालीचं वर्कआऊट करताना दिसतोय. टोन्ड बॉडी आणि वॉशबोर्ड ॲब्स फ्लाँट तो यात दाखवत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सोनू सूदने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की "माझा दिवस २२ तासांचा आहे आणि २ तास माझ्या फिटनेससाठी आहे.”
सोनू सूदचा फतेह चित्रपट
हा व्हिडिओ शेअर करताच अनेक चाहत्यांनी यावर कॉमेंट्स केल्या आहेत. सोनू सूदच्या पहिल्या दिग्दर्शनाचा उपक्रम असलेल्या ‘फतेह’ बद्दल बोलताना अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत सायबर क्राईम थ्रिलरमध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सोनू सूदच्या चाहत्यांनी अशा केल्या कॉमेंट्स
सोनू सूदचा कठीण वर्क पाहून चाहत्यांनी 'रिअल हिरो', 'ग्रेट यु आर सर', 'माझा फेव्हरेट' अशा कॉमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी हार्ट आणि लव्हली इमोजी देखील शेअर केल्या आहेत.

