वैष्णवदेवी नगरात फर्निचरचे दुकान जळून खाक

नागपूर येथील घटना ; आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान
Furniture burnt in a fire in Nagpur
नागपूर येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले फर्निचर Reprentative Photo
Published on
Updated on

नागपूर : कामठी रोडवरील वैष्णवदेवीनगरात एका फर्निचरच्या दुकानाला बुधवारी (दि.26) सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत दुकानातील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले. तसेच या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या नंतर कळमना अग्निशमन केंद्रासह सिव्हिल लाईन्स येथील मुख्य अग्निशमन केंद्रातून चार गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचल्या. हे दुकान नारायण सोनटक्के यांच्या मालकीचे असून ते तिथे भाडे तत्वावर इथे व्यवसाय करत आहेत. प्लायवूड, लाकूड आणि फोम असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. ज्वलनशील वस्तू आगीमध्ये असल्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला.

Furniture burnt in a fire in Nagpur
शॉर्टसर्किटची आग टाळण्यासाठी…

आगीत सोफा, लाकूड, लाकूड, प्लायवूड, पॉम्प्रेशर मशीन, शिलाई मशीन, प्लायवूड चिकटविण्यासाठी लागणारे सोल्युशनसह इतर साहित्य जळाले आहे. दुकानामध्ये अग्निशमन सुविधेचा अभाव असल्याची माहिती सुत्रांनी सांगितली आहे.या आगीमुळे दुकानातील विजेच्या वायरसह इलेक्ट्रिक बोर्डही जळाले त्यामुळे आगीची तिव्रता वाढली होती. काही मिनिटांच्या परिश्रमानंतर आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news