विजय देवरकोंडा-मृणाल ठाकुरचा 'द फॅमिली स्टार' OTT वर

विजय देवरकोंडा-मृणाल ठाकुरच्या 'फॅमिली स्टार'ची ओटीटीवर धूम
The Family Star on OTT
विजय देवरकोंडा-मृणाल ठाकुर यांचा द फॅमिली स्टार ओटीटीवर येणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विजय देवरकोंडा-मृणाल ठाकुरचा फॅमिली ड्रामा आणि रोमँटिक एंटरटेनर चित्रपट 'द फॅमिली स्टार' ५ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटाला चित्रपटगृहातकून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट हिंदीमधून चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून क्या ओटीटीवर कधी पाहायला मिळणार 'द फॅमिली स्टार'.

The Family Star on OTT
'समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा'-किरण माने
Summary

काय आहे 'द फॅमिली स्टार'ची कहाणी?

'द फॅमिली स्टार' एक मध्यमवर्गीय पिरवाराची कहाणी आहे. चित्रपटात गोवर्धन (विजय देवरकोंडा) च्या भमिकेभोवती ही कहाणी फिरते. त्याच्यासाठी परिवारातील सदस्यांचा आनंद प्राधान्याने महत्त्वाचा आहे. पण, जेव्हा त्याच्या जीवनात मृणाल ठाकुरच्या भूमिकेची एन्ट्री होते, तेव्हा सर्व गोष्टी बदलतात.

कधी रिलीज होणार द फॅमिली स्टार?

परशुराम पेटला दिग्दर्शित 'द फॅमिली स्टार' मध्ये विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकुर यांची जोडी दिसली होती. दोघांची केमिस्ट्री फॅन्सच्या पसंतीस उतरली होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. आता घरी बसल्या हा चित्रपट ओटीटीवर हिंदीमध्ये पाहता येईल. चित्रपट निर्मात्यांनी२८ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जियो सिनेमावर दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट निर्मात्यांनी एका पोस्टरच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

The Family Star on OTT
फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट व्हायरल, फतेहसाठी अशी घेतली मेहनत

'द फॅमिली स्टार' कास्ट

'द फॅमिली स्टार' मध्ये विजय देवरकोंडासोबत मृणाल ठाकुर, वासुकी, रोहिणी हट्टंगडी, वेनेला किशोर, जगपति बाबू, अच्युत कुमार, रवि बाबू, अजय घोष आणि दिव्यांशा यासारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

The Family Star on OTT
‘तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news