Frank Duckworth : डकवर्थ-लुईस नियमाचे सहनिर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

डकवर्थ-लुईस नियमाचे सहनिर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन
Death of Frank Duckworth, co-creator of the Duckworth-Lewis rule
क्रिकेटविश्वातील डकवर्थ-लुईस नियमाचे सहनिर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले.Frank Duckworth File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : क्रिकेटविश्वातील डकवर्थ-लुईस नियमाचे सहनिर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले. फ्रँक डकवर्थ 84 वर्षांचे होते. फ्रँक डकवर्थ यांचे 21 जूनला निधन झाले. डकवर्थ-लुईस नियम हा फ्रँक डकवर्थ आणि त्यांचे सहकारी टोनी लुईस यांनी विकसित केला होता.

या नियमाचा उपयोग हा पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी होतो. टोनी लुईस यांचे 2020 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डकवर्थ-लुईस नियमाचा उपयोग हा 1997 मध्ये सर्वात पहिल्यांदा करण्यात आला होता. यानंतर 2001 मध्ये आयसीसीद्वारे कमी ओव्हरच्या सामन्यांमध्ये टार्गेट निश्चित करण्यासाठी एका औपचारिक पद्धतीने हा नियम वापरण्यात आला होता. विशेष म्हणजे, डकवर्थ-लुईस या नियमाचा उपयोग आजपर्यंत करण्यात येतो आहे. अफगाणिस्तान विरुद्ध बांगला देश यांच्यातील सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानेच अफगाणिस्तानचा विजय झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news