केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी नाकारला सुरक्षा जवानांचा ‘सॅल्यूट’

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सुरक्षा जवानांना मंत्री मोहोळांकडून सॅल्यूट न करण्याची विनंती
Minister Mohol rejects 'Salute' of security personnel
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. मोहोळ हे अधिवेशनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत. दरम्यान, त्यांच्या वागण्यातील साधेपणा सुरक्षा यंत्रणांना अनुभवायला मिळाला आहे. ‘मला सॅल्यूट वगैरे करू नका, नमस्कार केला नाही तरी चालेल!’ असा प्रेमळ सल्ला मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र सदनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व खासदार दिल्लीत आहेत. त्यामुळे एरवीही सतर्क असलेली इथली सुरक्षा यंत्रणा सध्या अधिक दक्ष आहे. देशभरातील नवनवीन खासदारांची या परिसरात रोंदळ सुरु आहे. त्यातच मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले काही चेहरेही प्रशासनाच्या दृष्टीने नवीन आहेत.

Minister Mohol rejects 'Salute' of security personnel
समृद्धीसाठी सहकाराने घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत काम करा: मोहोळ यांची अपेक्षा

महाराष्ट्र सदनात सॅल्यूट करणाऱ्या सुरक्षा जवानांना एकत्र बोलावून मोहोळ म्हणाले की, ‘कोणत्याही सुरक्षा जवानाने यापुढे मला सॅल्यूट करू नये. तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडायलाच हवीत. मात्र, मानसन्मान माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तर कर्तव्य महत्त्वाचे आहे. यापुढे कोणीही मला सॅल्यूट करण्यासाठी हात उंचावू नका. याबरोबरच मला नमस्कार नाही केला, तरी चालेल.’ असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news