रामझुला हिट अँड रन : मालूंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पोलिसांचा अटकेचा मार्ग मोकळा
Mercedes hit and Run Accident Nagpur
रामझुला हिट अँड रन प्रकरणातील कार आणि मृ्त्यूमुखीं पडलेले तरुणPudhari File Photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर मधील रामझुला येथे 25 फेब्रुवारी मध्यरात्री हिट अँड रन प्रकरण घडले होते. नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरातील झालेल्या या हिट अँड रन प्रकरणात आरोपी रितिका मालू यांचा अटकपूर्व जामीन आज बुधवारी (दि.26) उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • फेब्रुवारी महिन्यांमध्ये हिट अँड रन प्रकरण घडले

  • या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे

  • नागपूर खंडपीठाने रितिका उर्फ ​​रितू मालूला अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्या आत्मसमर्पण करतात कीस सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भीषण अपघातात मर्सिडीजने धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. कार चालक आरोपी रितिका मालू विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रितिका उर्फ ​​रितू मालूला अटकपूर्व जामीन नाकारला आहे. रामझुला येथे झालेल्या भीषण अपघातातील आरोपीला पाच महिने होत असताना अटक झालेली नाही.

Mercedes hit and Run Accident Nagpur
Nagpur Hit And Run Case : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील कार चालकास अटक

पोलीस राजकीय दबावाखाली उद्योजक कुटुंबातील रितिका यांना अभय देत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मालू यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. भोसले (पाटील) यांनी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news