'Rashid Khan'चा T-20मध्ये मोठा पराक्रम! ठरला पहिला गोलंदाज

सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 2ऱ्या स्थानावर
Rashid Khan Bowling Records
राशिद खान आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. Photo Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rashid Khan : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार निश्चित झाले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात अफगाण संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे, तर या सामन्यात अफगाण संघाचा कर्णधार राशिद खाननेही चेंडूसह मोठी कामगिरी केली. आता तो आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Summary
  • राशिद खानने नवा विक्रम केला आहे.

  • तो टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.

  • अव्वल स्थानी न्यूझीलंडचा टीम साउदी आहे

एकाच वेळी दोन मोठे विक्रम

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात राशिद खानने (Rashid Khan) आपल्या फिरकीची जादू दाखवत 4 षटकात केवळ 23 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 150 विकेट्स पूर्ण केल्या. हा आकडा पार करणारा तो न्यूझीलंडच्या टीम साऊदीनंतर (164 विकेट्स) दुसरा गोलंदाज ठरला आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये राशिद खानच्या नावावर आता 152 विकेट्स जमा झाल्या आहेत.

राशिदने शाकिबला टाकले मागे

राशिदने (Rashid Khan) बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनला एका मोठ्या विक्रमात मागे टाकले. तो आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 4 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने असा पराक्रम 9 व्यांदा केला आहे. तर शाकिबने 8 वेळा 4 विकेट्स घेण्याची लागगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा 4 प्लस विकेट घेणारे गोलंदाज

राशिद खान : 9 वेळा

शाकिब अल हसन : 8 वेळा

हेन्री सेन्योन्डो (युगांडा) : 7 वेळा

ध्रुवकुमार मायासुरैया (बोत्स्वाना) : 6 वेळा

नलिन निपाईको (वांटुटू) : 6 वेळा

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

टीम साऊदी : 164 विकेट्स

राशिद खान : 152 विकेट्स

शकिब अल हसन : 149 विकेट्स

ईश सोधी : 138 विकेट्स

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news