Paris Olympic 2024 : भारताच्‍या पुरुष हॉकी संघाची घोषणा

हरमनप्रीत सिंग करणार संघाचे नेतृत्व
Paris Olympic 2024
आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी आज भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्‍यात आली.ANI Photo
Published on
Updated on

आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी आज (दि.२६) भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्‍यात आली. २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत होणाऱ्या या स्‍पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्त्‍व हरमनप्रीत सिंग करणार आहे. मिडफिल्डर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. हरमनप्रीत सिंग हा तिसर्‍यांदा ऑलिम्पिक स्‍पर्धेत सहभागी होणार आहे.

अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्‍याय, मनदीप सिंह आणि गुरुजंत सिंह या अनुभवी खेळाडूंबरोबरच गोलकीपर कृष्ण बहादुर पाठक, मिडफिल्डर नीलकांत शर्मा आणि डिफेंडर जुगराज सिंह यांच्‍या सहभागाने संघ अधिक मजबूत झाला आहे. विशेष म्‍हणजे, यंदा जरमनप्रीत सिंह, संजय, राज कुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंह हे पाच युवा खेळाडू प्रथम ऑलिम्पिक स्‍पर्धेत खेळणार आहेत.

आम्ही जगातील सर्वोत्तम संघांना सामोरे जाण्यासाठी तयारीत : प्रशिक्षक क्रेग फुल्टन

संघ निवडीबाबत बोलताना भारतीय हॉकी संघचे मुख्‍य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले की, "ऑलिम्पिक संघात निवडलेल्या खेळाडूने आपलं कौशल्य, समर्पण आणि लवचिकता दाखवली आहे. या संघात निवडलेला गेलेला प्रत्‍येक खेळाडू हा कठोर परीश्रम घेत आहे. हा संघ अनुभवी खेळाडू आणि आश्वासक युवा प्रतिभांचा एक परिपूर्ण मिश्रण आहे. आता आम्‍ही पॅरिसमध्‍ये जगातील सर्वोत्तम संघांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत."

पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये भारत ब गटात

यंदाच्‍या पॅरीस ऑलिम्पिकमध्‍ये भारतीय संघ हा बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसह ब गटात आहे. उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी संघाला पहिल्‍या चार संघात स्‍थान मिळवावे लागले. यंदा ऑलिम्पिकसाठी एकूण १२ संघ पात्र ठरले आहेत. अ गटामध्‍ये नेदरलँड, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान फ्रान्‍स या संघांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news