Israel Attack : इस्रायलचा हमासवर बॉम्ब हल्ला

इस्रायलचा हमासवर बॉम्ब हल्ला
The Israeli army bombarded Gaza City once again.
इस्रायली सैन्याने गाझा शहरात पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. Bomb attack File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली सैन्याने गाझा शहरात पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला केला. इस्रायली सैन्याने हवाई हल्ला करत शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील परिसराला लक्ष्य केले. यामध्ये 26 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इस्रायली विमानाने शहराच्या पश्चिमेकडील अल-शत्ती निर्वासित छावणीतील हानिएह कुटुंबाच्या घरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माईल हनीयेह यांच्या बहिणीसह 10 लोक ठार झाले. तर कुटुंबातील अनेक सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

इस्रायलच्या नागरी संरक्षण महासंचालनालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. इस्त्रायली सुरक्षा दलांनी गाझा शहराच्या पूर्वेकडील अल-दरराज भागातील शाळा आणि शहराच्या पश्चिमेकडील अल-शत्ती कॅम्पमधील आणखी एका शाळेला लक्ष्य केले. याशिवाय अल-शुजैया परिसरातील अल-जमीली कुटुंबाच्या घरालाही लक्ष्य करण्यात आले. निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांनी या ठिकाणांहून 13 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अनेक जखमींना तेथून बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम गाझा येथे पॅलेस्टिनींच्या सभेवर हल्ला झाला.

The Israeli army bombarded Gaza City once again.
Israel-Hamas War : इस्रायलच्‍या हवाई हल्‍ल्‍यात हमासचा कमांडर ठार

स्थानिक स्रोत आणि साक्षीदारांच्या मते, इस्रायली विमानांनी गाझा शहराच्या पश्चिमेला पॅलेस्टिनींच्या मेळाव्यावर हल्ला केला, ज्यात 3 लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) मंगळवारी (दि.25) एका निवेदनात सांगितले की, इस्रायली सैन्याने उत्तर गाझा पट्टीतील शाती आणि दराज तुफाह येथील 2 इमारतींवर हल्ला केला. या इमारतींचा वापर हमासचे दहशतवादी करत होते. ते म्हणाले, 'दहशतवादी शाळेच्या परिसरातून दहशतवादी कारवाया करत होते. शाळेचा परिसर हमासने आपल्या दहशतवादी कारवायांसाठी वापरला होता.

The Israeli army bombarded Gaza City once again.
Israel Hamas War : इस्रायली हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; ४ ओलिसांची सुटका

'दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजनात सहभागी'

या ठिकाणी लपलेले दहशतवादी इस्रायलवर अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हल्ले केल्यानंतर लोकांना ओलीस ठेवण्यात काही दहशतवाद्यांचा हात होता. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा रॉकेट हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 250 लोकांना ओलीस बनवले होते. इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझा पट्टीत हमासवर जोरदार हल्ला चढवला, ज्यानंतर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news