'समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा'-किरण माने

Rajarshri Shahu Maharaj Jayanti ला किरण मानेंची लक्षवेधी पोस्ट
Kiran Mane Rajarshri Shahu Maharaj Jayanti
राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी किरण माने यांनी वंदन केले Kiran Mane Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी टीव्ही अभिनेते किरण माने यांनी एक फोटो पोस्ट करत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले आहे. आज २६ जून रोजी शाहू महाराज यांची जयंती आहे. त्या औचित्याने किरण माने यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane Rajarshri Shahu Maharaj Jayanti
'सोनाक्षी-जहीर' नव्या जोडप्याचं रोमँटिक फोटोशूट
Summary

राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी किरण माने यांनी त्यांना वंदन करत फोटो पोस्ट लिहिली आहे. शाहू महाराज यांना वंदन करताना त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे.

किरण माने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले?

"महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत.”

...सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावलं.

...शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्‍या द्यायला सुरूवात केली होती. त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता.

Kiran Mane Rajarshri Shahu Maharaj Jayanti
नाराजी दूर! शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इकबालने एकत्र दिली पोझ (Video)

...महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, "चंदी आन रं." त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्‍हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, "बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि 'लायक' होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्‍हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत... मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला???"

अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आवो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली. माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य - बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली !

...फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्‍या दिल्या गेल्या. त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले !

...जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले...विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !

Kiran Mane Rajarshri Shahu Maharaj Jayanti
‘तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक

कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा होता! "शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते." असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही.

या देशातला समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा !

- किरण माने.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news