हिंगोली : पिकअप पलटी होऊन अपघात; दोघे ठार

भाजीपाला नेताना पिकअपला अपघात झाला
Hingoli Accident
हिंगोलीत भाजीपाला नेताना पिकअपला अपघात Pudhari File Photo

धोंडराई : आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन जाणारा पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. कोळगाव येथील बायपास जवळच्या पुलाजवळ बुधवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. राजू सुरेश बांगर (वय २७ वर्षे) व त्याचा सहकारी नागोजी इंगोले ( वय ३५ ) अशी अपघातातील मृतांची नावे आहे.

Hingoli Accident
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

याबाबत अधिक माहिती अशी, आळेफाटा येथील राजू बांगर व नागोजी इंगोले हे दोघे आपल्या पिकअपमधून मिर्ची आणि कोबी घेऊन हिंगोलीला विक्रीसाठी घेऊन जात होते. यादरम्यान कोळेगाव येथील बायपास जवळच्या पुलाजवळ आले असता त्याच्या पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटले. व पिकअप पलटी झाला. या भीषण अपघातात सुरेश बांगर व नागोजी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news