आफ्रिकेत खातात चक्क डासांचा बर्गर!

आफ्रिकेत डासांपासून बनवलेला अनोखा आहार
African people eat mosquito burger
आफ्रिकेत चक्क डासांचे बर्गरही खाल्ले जातात.Pudhari File photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : आफ्रिकेत डासांमुळे फैलावणार्‍या मलेरियाची मोठीच दहशत आहे. डासांचा येनकेन प्रकारे नायनाट करण्यासाठी जगभर संशोधने सुरू असतात; मात्र याच आफ्रिकेत चक्क डासांचे बर्गरही खाल्ले जाते याची अनेकांना माहिती नसेल. अनेक ठिकाणी कीटकांचाही आहारात समावेश केला जात असतो. मात्र डासांचाही असा समावेश केला जाईल याची अनेक लोक कल्पना करणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर आफ्रिकेत डासांपासून तयार करून खाल्ल्या जाणार्‍या बर्गरची तुफान चर्चा होत आहे.

African people eat mosquito burger
सोलापूर: मोहोळ येथे दोन कारची धडक: १ जण ठार

डासांच्या बर्गरबद्दल माहिती देणारा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर या आफ्रिकेतील डासांच्या बर्गरबद्दल माहिती देणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की या बर्गरमधील एक पॅटीस ही जवळपास सहा लाख डासांपासून बनवली जाते. पावसाळ्यात व्हिक्टोरिया तलावाजवळ पैदास होणार्‍या डासांचा वापर यासाठी केला जातो. अनेक तज्ज्ञ कीटकांचा आहारात वापर करण्याची भलावण करत असतात. याचे कारण म्हणजे कीटकांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. अनेकदा त्यांमधील प्रथिनांचे प्रमाण हे पारंपरिक मांसाहारातील प्रमाणापेक्षादेखील अधिक असते. कीटक हे उच्च गुणवत्ता असणार्‍या प्रथिनांचे स्रोत असून, त्यांमध्ये शरीरास आवश्यक असणारे अमिनो अ‍ॅसिडदेखील उपलब्ध असते, असे या तज्ज्ञांचे म्हणणे असते.

African people eat mosquito burger
बामणी येथील ठिय्या आंदोलनस्थळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट

किडे खाण्याची पद्धत

कीटकांमध्ये बी-12 आणि रिबोफ्लेव्हिनसारखी विविध जीवनसत्त्वे, लोह, झिंक व मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे उपलब्ध असतात. काही कीटकांमध्ये ओमेगा 3 व ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिडसारखे घटकदेखील उपलब्ध असतात. इतकेच नव्हे, तर पचनशक्तीसाठी उपयुक्त असणारे काइटिन नामक फायबरसुद्धा कीटकांमध्ये सापडते. एंटोमोफॅजी म्हणजेच किडे खाण्याची पद्धत ही आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकेमध्ये कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र, पाश्चिमात्य समाजाने या पद्धतीचा कायमच तिरस्कार केला आहे. परंतु, आता ही परिस्थिती बदलली असून, अनेक जण कीटकांकडे खाण्यास आरोग्यदायी आणि आहाराचा सस्टेनेबल स्रोत म्हणून पाहू लागले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news