Nashik Accident|सिडकोत स्कूल बसच्या धडकेत इंजिनीअरिंगचा विद्यार्थी ठार

दुचाकीवरुन चालला होता, गाडीच्या चाकाखाली सापडला

Student killed in bus accident
सिडकोत स्कूल बसच्या धडकेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ठार

सिडको : सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे दुचाकी व शाळेच्या बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात अठरा वर्षीय इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवार (दि.26) साडेबारा वाजेच्या सुमारास दिव्याऍडलॅब कडून त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे मयूर दत्ता गुंजाळ (१८,महाले फार्म राणाप्रताप चौक सिडको) हा त्याच्या इलेक्ट्रिकल बाईक वरून जात असतांना यावेळी येथूनच जाणारी एका खासगी शाळेची बस क्रमांक (एम. एच. १५ ई.एफ.०६१०) ही शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असतांना गाडीच्या चाकाखाली सापडल्याने अपघात झाला. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासीयांनी मयूर गुंजाळ यास त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालावली. याबाबत अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे

स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

१२:३० वाजेच्या सुमारस कामटवाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे नर्सरीचे मुले शाळेच्या बस मधून घरी सोडायला घेऊन जात असताना हा अपघात झाला असून गाडी चालक मनीष  दिनकरराव दळवी (वय ५५ रा. कॅनडा कॉर्नर) याच्या  विरोधात अंबड पोलीस ठाण्यात  अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news