सोनाक्षी-जहीरचा विवाहसोहळा; लाल साडी, गजऱ्यात नटलेल्या अभिनेत्रीचा पहिला फोटो

लाल साडीत नटली सोनाक्षी सिन्हा; लग्न-रिसेप्शन व्हिडिओ व्हायरल
Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
सोनाक्षीने रिसेप्शनसाठी लाल साडी निवडली होती Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाक्षी सिन्हा - जहीर इकबाल अखेर लग्नबंधनात अडकले. या लव्हबर्डने काल सायंकाळी परिवार आणि जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये रजिस्टर मॅरेज केलं. दोघांनी सह्या केल्या. त्यानंतर एक रिसेप्शन देखील होस्ट करण्यात आलं. या पार्टीत तमाम बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली. या रिसेप्शनमधून पहिला फोटो समोर आला आहे.

Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरुन देणार? किरण मानेंची NEET वर पोस्ट
Summary

२०१७ मध्ये सलमान खानच्या एका पार्टीत सोनाक्षी सिन्हाची भेट जहीर इकबालशी झाली होती. जहीर इकबालचे वडील हे सलमान खानचे चांगले मित्र आहेत. तर सलमाननेच सोनाक्षीला दबंग या चित्रपटातून मोठा ब्रेक दिला होता.

Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
रजिस्टर मॅरेजवेळी सोनाक्षी सिन्हाने पांढरी साडी नेसली होतीInstagram
Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
केतकी चितळेवर किरण मानेंची पोस्ट, ‘अख्खा दर्द तू या व्हिडीओतून पिळवटून ओतलास लै लै म्हंजी लैच ठैंक्यू’

असा होता सोनाक्षी-जहीरचा लूक

सोनाक्षी सिन्हा लग्नादरम्यान, व्हाईट साडी आणि केसात गजरा अशा सुंदर लूकमध्ये पाहण्यात आलं. रिसेप्शनमध्येही ती खूप सुंदर दिसली. रिसेप्शनमध्ये तिने लाल रंगाची साडी घातली होती. तिने केसांच्या भांगेत सिंदूर, केसात गजरा आणि हातात महावर (अलता) लावला होता. जहीर व्हाईट कलर इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसला. पार्टीत दोघे एकत्र फ्रेममध्ये पोझ देताना दिसले. तिच्या चेहऱ्यावर वेडिंग ग्लो देखील पाहायला मिळाला. यावेळी सोनाक्षी-जहीर दोघेही खूश दिसले.

Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
जहीरने पांढरा इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केला Instagram
Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
Bigg Boss OTT 3 मध्ये 'जनता की एजंट' बनलेली हॉट सना सुलतान कोण आहे?

सोनाक्षी-जहीरने ७ वर्षे केलं डेट

सोनाक्षी सिन्हा - जहीर इकबालने ७ वर्षे एकमेकांना डेट केलं. सोनाक्षीला सलमान खानने इंडस्ट्रीमध्ये मोठा ब्रेक दिला होता. तर सलमान खानच्या अगदी जवळ जहीर इकबाल आहे. त्यांची भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. तिने सांगितलं की, २३ जूनला त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती.

Zaheer Iqbal-Sonakshi Sinha wedding
केसात गजदार, भांगेत सिंदूर आणि दागिने अशा लूकमध्ये ती सुंदर दिसलीInstagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news