सतीश कौशिक मृत्यू प्रकरण : पोलिसांनी 'ते' सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवरील सात तासांच्या सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. कौशिक यांनी होळी साजरी केली होती. या नंतरच्या काळातील कौशिक यांचे वास्तव्य असणार्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. (Satish Kaushik Farmhouse)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक आणि हृदयविकाराच्या झटक्याने झाला. अहवालालात दिलेल्या माहितीनुसार, हा हृदयविकाराचा झटका कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजमुळे आलेला होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास करण्यासाठी कौशिक यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. होळी साजरी केल्यानंतर कौशिक हे आपल्या दिल्लीतील मित्राच्या फॉर्म हाउसवर मुक्कामास होते. या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Satish Kaushik Farmhouse)
अभिनेता सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंटस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. (Satish Kaushik death )
Delhi Police to examine 7 hrs of CCTV footage in Satish Kaushik death
Read @ANI Story | https://t.co/xLmoZ8on5z#SatishKaushik #SatishKaushikDeath #DelhiPolice pic.twitter.com/n7cogvfzD9
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2023
हेही वाचा
- पुणे न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे ही मानसिक क्रुरता, पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर
- मुंबईतील जोगेश्वरीत इमारतीवरील लोखंडी रॉड रिक्षावर कोसळून महिला ठार; चिमुकली गंभीर
- Blood Donation Ban To Transgender : सेक्सवर्कर, ट्रान्सजेंडर, समलैंगिक पुरुषांना रक्तदानापासून का वगळले? सर्वोच्च न्यायालायत दिले उत्तर