Mallikarjun Kharge : लोकसभा अध्यक्ष पदासाठी इंडिया आघाडीची खलबते

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक
Mallikarjun Kharge News
लोकसभा अध्यक्ष पदासाठी इंडिया आघाडीची बैठक पार पडली.Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असताना एनडीएसह इंडिया आघाडीमध्येही खलबते सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष पदावरून इंडिया आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या माध्यमातून खर्गे यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Mallikarjun Kharge News
Priyank Kharge : काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना मंत्रिपद

या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या खा. सुप्रिया सुळे आणि तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जीही उपस्थित होते. तसेच समाजवादी पक्षाचे सरचिटणीस प्रा. राम गोपाल यादव, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, द्रमुक नेते टी. आर. बालू, एन. के. प्रेमचंद्रन, हनुमान बेनिवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे विविध नेते उपस्थित होते.

Mallikarjun Kharge News
संसद परिसरातील महापुरूषांचे पुतळे पूर्ववत स्थापित करा : मल्लिकार्जून खर्गे

इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या (बुधवारी) लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये सामंजस्य कसे राहील, यावरही भर देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news