Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी

इंडिया आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Rahul Gandhi News
राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार आहेतPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी मंगळवारी निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांनाच मिळणार अशी शक्यता होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Rahul Gandhi News
आज नाही तर उद्या सत्याचा विजय हाेताेच : राहूल गांधी

राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेतेपदाची अधिकृत घोषणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या नियुक्तीची माहिती दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर काँग्रेसच्या वतीने के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

Rahul Gandhi News
PM Modi | भाजपला प. बंगालमध्ये मोठे यश मि‍ळेल, पीएम मोदींचा दावा

अध्यक्षपदासाठी बुधवारी लोकसभेत मतदान होणार आहे. इंडिया आघाडीने उपाध्यक्षपदासाठी आग्रही मागणी केली होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने (एनडीए) ही मागणी फेटाळल्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनेही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news