मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार

मंदिर समितीच्या वतीने महापूजेचे निमंत्रण
Shri Vitthal-Rukmini Mahapuja
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रणPudhari News Network
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रा बुधवारी (दि. 17 जुलै) आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (दि. 25) सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीने दिले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे.

आषाढी यात्रेत वारकरी भाविकांना देण्यात येणार्‍या सेवासुविधांच्या नियोजनाची माहिती त्यांनी जाणून घेतल्याची माहिती मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. निमत्रण देतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, अ‍ॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्यावतीने केला. यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे. याबाबत केलेल्या नियाोजनाची माहिती शेळके यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news