तेलंगणा CM रेवंथ रेड्डींच्या ताफ्यातील वाहनांची भरारी पथकाकडून तपासणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या ताफ्याच्या वाहनांची आज ( दि. ४) खम्मममध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
#WATCH | Telangana: The vehicles of state Chief Minister and TPCC Chief Revanth Reddy’s convoy were checked by the Election Commission Flying Squad in Khammam today. pic.twitter.com/uxIEGwJzZz
— ANI (@ANI) May 4, 2024
तेलंगणातील लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणा राज्यात एकाच टप्प्यात 13 मे रोजी होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील प्रचार शिगेला पाेहचला आहे. अशातच मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या ताफ्याच्या वाहनांची खम्मममध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने तामिळनाडूमधील निलगिरीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली हेती. यावेळी ते म्हैसूर ते निलगिरी असे हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली होती.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी रायबरेली-वायनाडमधून जिंकल्यास प्रियांका वधेरा ‘पोटनिवडणूक’ लढणार! काँग्रेसचे संकेत
- Lok Sabha Election 2024 : मध्यप्रदेशात ‘महाराजा’ आणि मामांच्या भाग्याचा फैसला होणार
- Lok Sabha Elections 2024 : अजितदादांचे कौतुक करताना महादेव जानकर चुकले, म्हणाले…’भामटा’, व्हिडिओ व्हायरल