बीड: श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी गेवराईत मुक्कामी | पुढारी

बीड: श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी गेवराईत मुक्कामी

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरहून आषाढी वारी करून परत येणारी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी मंगळवारी (दि. ११) गेवराई येथे मुक्कामी थांबणार आहे. जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत पालखीचे दर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन गेवराई येथील श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने केले आहे.

बीडहून गजानन महाराज यांची पालखी वाजत गाजत तीन अश्वासह येते. पेंडगाव येथे दुपारचे जेवण करून गेवराईत दाखल होते. शहरातील मोढा नाका, पंचायत समिती रोड, जुने बसस्थानक मार्गे पालखी जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पोहोचते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीसाठी लाखों दिंडी येत असतात. या दिंडीत गजानन महाराजांच्या पालखीची शिस्त, स्वच्छता आणि भक्तीभाव वाखाणण्याजोगा असतो. एकमेव वाशी ड्रेसकोड असलेली पालखी वाजत गाजत गजानन महाराजांचा गजर करत पंढरपूरहून गेवराई येथे मुक्काम येते.

हेही वाचा 

Back to top button