भारती सिंहला अजुनही हवी आहे तिसरी... म्हणाली, म्हणून नाही केली नसबंदी!

तिसऱ्या बाळासाठी भारती सिंहचा मोठा निर्णय; म्हणाली, पुन्हा मुलगाच झाला तर टक्कल पडेल!
Comedian bharti singh
भारती सिंहला अजुनही हवी आहे तिसरी... म्हणाली, म्हणून नाही केली नसबंदी! File Photo
Published on
Updated on

Comedian bharti singh want girl after second baby boy says nasbandi nahi krwaungi

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कॉमेडियन भारती सिंहने नुकताच दुसऱ्या मुलाला जम्न दिला. यानंतर तीने यूट्यूबवर लेटेस्ट व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने डिलिव्हरीपूर्वीची परिस्थिती आणि डिलिव्हरीनंतरचा हेल्थ अपडेट दिली आहे. तसेच, तिला अजूनही मुलगी हवी असल्यामुळे तिने नसबंदीसाठी होकार दिला नसल्याचंही सांगितलं आहे.

Comedian bharti singh
Box Office Collection | Avatar Fire & Ash चं तिकिट बारीवर दमदार ओपनिंग; Dhurandhar ने पार केले ५०० कोटी, जाणून घ्या डिटेल्स

सध्या कॉमेडियन भारती सिंह मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहे. 19 डिसेंबरच्या सकाळी तिने मुलगा ‘काजू’ ला जन्म दिला. ही माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. आता तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये तिने डिलिव्हरीपूर्वी आणि नंतरचे अनुभव सांगितले आहेत. तिचं वॉटर बॅग कसं फुटलं, कपडे आणि बेड सगळं कसं ओलं झालं, हेही तिने सांगितलं. डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात येण्यास सांगितलं. याच व्लॉगमध्ये तिने नसबंदी न केल्याचाही खुलासा केला आहे.

भारती सांगते की, ती रात्री बॅग आवरत होती आणि सकाळी अचानक हे सगळं घडलं. या दरम्यान ती भावूकही झाली. 18 डिसेंबरच्या रात्रीपासूनच तिला काहीतरी विचित्र वाटत होतं. “काय होत आहे ते समजत नव्हतं आणि सकाळी सगळंच ओलं झालं. देवाचं नाव घेऊन ती घरातून निघते आणि हर्ष तिला गाडीत बसवून रुग्णालयात घेऊन जातो.

Comedian bharti singh
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारला अपघात

डिलिव्हरीनंतर अनेक तास भारतीला बाळ भेटू शकले नाही

हर्षने सांगितलं की, गोला (पहिल्या मुला) च्या वेळी भारतीला 8-10 तास प्रसूतीवेदना सहन कराव्या लागल्या होत्या, जे खूप भीतीदायक होतं. पण यावेळी तसं काही झालं नाही, सगळं पटकन पार पडलं. ऑपरेशननंतर भारती बेडवर झोपूनच व्लॉग करते. तिने सांगितलं की, ऑपरेशन थिएटरमध्येच तिला समजलं होतं की मुलगा झाला आहे.

“बाळाला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आहे. डॉक्टर त्याची व्यवस्थित तपासणी करत आहेत, म्हणून अजून मला त्याला भेटता आलेलं नाही,” असं ती म्हणते.

हर्षने सांगितलं कसा आहे त्यांचा दुसरा मुलगा ‘काजू’

भारतीने हर्षला विचारलं, “काजू कसा आहे?” त्यावर हर्ष म्हणाला, “खूप गोड आणि खूप क्यूट आहे.”

भारती पुढे म्हणते, “मी दोन्ही प्रकारचे कपडे आणले होते – पिंक आणि ब्लू. तो माझ्याजवळ येताच मी तुम्हाला दाखवेन. मी खूप एक्साइटेड आहे. गोला सोबत दाखवेन. गोला खूप खुश आहे.”

ती म्हणते की, सध्या तिला जास्त प्रेम गोल्यावरच आहे कारण ती अजून काजूला भेटलेली नाही. यावर हर्ष गंमतीने म्हणतो, “तुझ्या आयुष्यात तीन मुलगे आहेत – एक सडपातळ आणि दोन जाडे!”

भारती सिंहने नसबंदी केली नाही

भारती म्हणते, “मला आता असंही वाटत नाही की मुलगी का नाही झाली. फक्त एवढंच वाटतं की बाळ झालं आहे, आता माझं बाळ मला दे. एक गोष्ट सांगते – डॉक्टरांनी मला विचारलं होतं की नसबंदी करायची का, तेव्हा मी ‘नाही’ म्हटलं.”

हे ऐकून हर्ष आश्चर्याने विचारतो, “अरे का यार? तू पुन्हा अशा कमजोर अवस्थेत… तू ठीक राहशील ना?”

यावर भारती म्हणते की, जर हर्ष म्हणाला तर ती तिसऱ्या बाळासाठीही तयार आहे.

भारती सिंहला अजूनही मुलगी हवी आहे

हर्ष म्हणतो, “नाही यार, मी तुला अजून त्रास देऊ शकत नाही. माझ्या मते एका बायकोकडून दोनच मुलं असावीत.” (हसत)

भारती म्हणते, “मी हर्षची नसबंदी करून टाकेन पण माझी नाही. माहित नाही का, बाळ झाल्यावर असं वाटतं की अजून एक असावं. एक मुलगी हवी यार. एक मुलगी झाली तर खूप मजा येईल. हो ना हर्ष?”

यावर हर्ष म्हणतो, “तिसरंही मुलगाच झाला तर?”

तेव्हा भारती हसत म्हणते, “मला टक्कल पडून जाईन, माझे केस मीच उपटून टाकेन.”

नंतर ती म्हणते की घरात मुली आधीच खूप आहेत, नाही झाली तरी चालेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news