

ठळक मुद्दे
नाशिक जिल्ह्यात 11 पैकी तब्बल 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी
भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी ३ नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश
In Nashik, Shinde's Shiv Sena emerged as the largest party.
नाशिक : जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागांचे निकाल हाती आले असून शिंदे यांची शिवसेना हा येथे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 11 पैकी तब्बल 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले असून भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी कायम आहे.
महाविकास आघाडीला एकही जागा नाही
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी ३ नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आले. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला 11 पैकी एकही नगराध्यक्ष पदाची जागा राखता न आल्याने महाविकास आघाडीचा नाशिकमध्ये पिछाडी आहे.
एकूणच हाती आलेला निकाल असा....
नाशिक जिल्हा ११ नगर परिषद निकाल
भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
येवला - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी विजयी
सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले विजयी.
नांदगाव - शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी
इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी
सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी
त्र्यंबकेश्वर - शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी
मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील विजयाच्या दिशेने.
चांदवड - भाजपचे वैभव बागुल विजयी
पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी
ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल विजयी
नाशिक जिल्ह्यातील भगूर नगरपरिषदेच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. भगूरमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होती. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप आणि महाविकास आघाडीचीही साथ होती. शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत होती. यात प्रेरणा बलकवडे यांचा विजय झाला.
भगूरमधील एकूण जागा – २१
पक्षनिहाय विजयी उमेदवार
भाजप - ५
शिंदेंची शिवसेना - ९
अजित पवार राष्ट्रवादी - ४
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - २
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर – ०
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपरिषदेत बाजी कोणाची?
नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी मनमाड नगर परिषदेच्या निवडणूकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनेही उडी घेतल्यानं लढत तिरंगी झाली होती. दुपारी अडीचपर्यंतच्या आकडेवारीनुसार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहाव्या फेरीअखेर शिंदेसेनेचे योगेश पाटील हे 2270 मतांनी आघाडीवर आहेत. तर प्रवीण नाईक 14,075 मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. योगेश पाटील यांना 16, 345 मते मिळाली आहेत.
येवला नगरपरिषदेत लक्षवेधी झालेल्या लढतीत उपमहाराष्ट्र केशरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) राजेंद्र लोणारी याचा विजय झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपरिषदेच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. येवला मध्ये मंत्री छगन भुजबळ विरुद्ध आमदार दराडे बंधू यांच्यात झालेली लढत महाराष्ट्रासह संपूर्ण येवलेकरांना बघायला मिळाली. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र लोणारी व रुपेश दराडे यांच्यात लक्षणीय लढत झाली.यात उपमहाराष्ट्र केशरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) राजेंद्र लोणारी यांचा विजय झाला.
येवलामधील एकूण जागा – 26
पक्षनिहाय विजयी उमेदवार
भाजप - ३ जागा
शिंदेंची शिवसेना - १० जागां
अजित पवार राष्ट्रवादी - ११ जागा
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - २ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून ११ जागा जिंकत आघाडी घेतली आहे तर शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवला असून भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला दोन जागा मिळाल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषदेच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. सिन्नरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत झाली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट असे पक्षनिहाय उमेदवार होते. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे समर्थक विठ्ठल अशोक उगले यांचा विजय झाला.
सिन्नरमधील एकूण जागा – 30
बिनविरोध - 01 (शिवसेना ठाकरे गट)
पक्षनिहाय विजयी उमेदवार
भाजप - 02
शिंदेंची शिवसेना - 01
अजित पवार राष्ट्रवादी - 13
काँग्रेस - 00
ठाकरेंची शिवसेना - 13 (बिनविरोध 01) = एकूण 14
शरद पवार राष्ट्रवादी - 00
इतर –00
एका दृष्टीक्षेपात
जिल्हा - नाशिक
जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ११
भाजप - ३
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर – ०