
288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालातून नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे ठरणार आहेत. अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. गेल्या 19 दिवसांपासून उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.
या निवडणुकीच्या निकालावर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्याही निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्यामुळे या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अपेक्षित विजयी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी गुलाल आणि ढोल-ताशांची जोरदार तयारी केली आहे. निकाल लागताच गुलालाची उधळण केली जाणार आहे.