Jayant Patil tweet : जयंत पाटील यांचे गुरुपौर्णिमा शुभेच्छांचे ट्विट, "मी जो काही आहे, ते माझे गुरु...'
![Jayant Patil tweet](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/07/03115443/Copy-of-After-stopping-the-convoy-in-Manipur-Rahul-Gandhi-said...-1-1.jpg)
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज गुरुपौर्णिमा. राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आपला फोटो शेअर करत म्हटल आहे,”मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.” (Jayant Patil tweet )
![One lesson from Maharashtra drama: observers should not take into account what is formally said by politicians; media persons need not ask for interviews and bytes.](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/07/03115223/Copy-of-After-stopping-the-convoy-in-Manipur-Rahul-Gandhi-said...-1.jpg)
माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. पवार (Ajit pawar latest) यांनी आज (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. शरद पवार यांच्यासमवेत आम्ही आहोत म्हणणारे फोटो, पोस्ट, ट्विट व्हायरल होवू लागले. अस भावनिक वातावरण सुरु आहे.
आज गुरुपौर्णिमा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमीत्त केलेले शुभेच्छांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आपला आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की,”भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.”
Jayant Patil tweet : मी शरद पवारांसोबत….
भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे.
मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच.… pic.twitter.com/CXvqqC1qwx
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 3, 2023