दिल्लीत उदयनराजे - मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट

राजकारणातील दोन दिग्गजांची दिल्लीत चर्चा
Murlidhar Mohol Meets Udayanraje in Delhi
दिल्ली : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले.Pudhari File Photo
Published on
Updated on

सातारा : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले.

Murlidhar Mohol Meets Udayanraje in Delhi
ICC T20 World Cup : अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्‍ये धडक

मोहोळ यांना घेतली उदयनराजेंची भेट

राज्य कुस्तीगीर परिषदेचे नेते व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेलेले खा. उदयनराजे भोसले हे दोघे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे खासदार आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर उदयनराजेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सोमवारी रात्री मंत्री मोहोळ यांनी उदयनराजेंची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उदयनराजेंनीही मोहोळ यांना मंत्रिपदाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावा लागेल, अशी चर्चाही झाली. यावेळी काका धुमाळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news