Akola News: माना येथे आढळलेल्या जैन मूर्तींबाबत आवाहन

अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी
Jain idol at Mana
माना येथे खोदकामात आढळलेल्या जैन धर्मियांच्या तीन मूर्तींबाबत अधिसूचना जारी केली. Pudhari News Network
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा: माना येथे खोदकामात आढळून आलेल्या जैन धर्मियांच्या पवित्र तीन मुर्त्यांबाबत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय निखात अधिनियम 1878 च्या कलम पाच अन्वये ही अधिसूचना आज (दि.२६) जारी करण्यात आली आहे.

Jain idol at Mana
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्यात दुसरा

माना येथील मातंगपुरा येथे रामेश्वर इंगोले यांच्या घराच्या आवारात आढळ्ल्या मूर्ती

अधिसूचनेनुसार, दि. 31 मार्च 2023 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे माना येथील मातंगपुरा येथे रामेश्वर इंगोले यांच्या घराच्या आवारात (नझूल भूखंड क्र. 181) पश्चिमेस खुल्या जागेत खोदकामात सांकेतिक चिन्हावरून जैन धर्मियांच्या नेमीनाथ भगवान, संभवनाथ भगवान, महावीर भगवान यांच्या तीन प्रतिमा आढळून आल्या होत्या.

Jain idol at Mana
अकोला: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

रामकृष्ण संस्थानच्या अध्यक्षांकडे मूर्त्यांचा ताबा देण्यात आला

या 3 मूर्ती तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करून माना येथील रामकृष्ण संस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव बाजीराव देशमुख व सचिव शिवकुमार सुंदरलालजी व्यास यांच्या ताब्यात देऊन त्याबाबतचा सुपूर्दनामा तयार करण्यात आला होता. तसेच मूर्ती ठेवलेल्या कक्षाची चावी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

Jain idol at Mana
अकोला: पेट्रोलपंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले

मूर्तीबाबत हरकती 12 नोव्हेंबर 2024 रोजी सादर करता येणार

या मुर्तीबाबत व काही भागाबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था यांना व्यक्तीशः अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हक्क, दावा, हरकती व इतर बाबी लेखी स्वरुपामध्ये दाखल करावयाचे झाल्यास त्यांनी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन येथे उपस्थित राहून दाखल करावे. वरील नमूद तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या दावे, हरकती, हक्क याबाबतचा कोणताही विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news